अशोकभाऊ जैन यांच्या प्रामुख् उपस्थितीत पार पडले
जळगाव – (प्रतिनिधी) – परिवर्तन आयोजित भवरलालभाऊ जैन यांना आदरांजली वाहणारा सर्व कलांचा संगम असलेला “भाउंना भावाजंली” महोत्सवात भाऊंच्या उद्यानातील आर्ट गॅलरीमध्ये आयोजित चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या हस्ते व अशोकभाऊ जैन यांच्या प्रामुख् उपस्थितीत पार पडले. सर्व कलांचा संगम असलेला 9 दिवसीय कला महोत्सव सध्या भाउंच्या उद्यानात सुरु आहे. याच उद्यानामधील आर्ट गैलरी मध्ये जिल्ह्या मधील चित्रकारांचे प्रदर्शन लागले आहे. अमूर्त, स्थलचित्र, रेखाटन अश्या विविध शैली मधील चित्र येथे आहेत. यात राजू बाविस्कर, प्रा राजू महाजन, विकास मलारा, विजय जैन, जितेंद्र सुरळकर, श्याम कुमावत या चित्रकारांची चित्रे या प्रदर्शनात लागली आहेत. या उद्घाटन प्रसंगी जेष्ठ शिल्पकार राम सुतार यांनी परिवर्तनचे कौतुक केले आणि परिवर्तन सारख्या संस्था यांनी कलेचा पैस तोलून धरला आहे असे गौरवोद्गार उद्घाटनानंतर चित्र प्रदर्शनाचे अवलोकन करताना काढले.याप्रसंगी जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, दलुभाऊ जैन, शंभू पाटील व चित्रकार उपस्थित होते. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन परिवर्तन तर्फे करण्यात आले आहे.