<
जामनेर-(अभिमान झाल्टे) – तालुक्यात अनेक वर्षापासून मागासवर्गीयांच्या प्रलंबित मागण्या अपूर्ण असून वारंवार शासनाकडे प्रशासनाकडे मागण्या करूनही अद्याप ते मान्य झाल्या नाहीत .
मागासवर्गीच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी रिपाइंच्या वतीने २७फेब्रुवारी 2020 वार गुरुवार पासून जामनेर तहसिल कार्यालयासमोर उपोषणास बसले आहे .
या मागण्या तीन-चार दिवसात मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहनाचा इशारा रिपाई कार्यकर्त्यांनी व अध्यक्ष भगवान सोनवणे यांनी दिला आहे .
या प्रमुख मागण्यात सारगाव गावी मागासवर्गीय घरकुलात काही जातीयवादी लोक जाणून-बुजून अडथळा निर्माण करून त्यांना घरकुला पासून वंचित ठेवत आहेत अशा जातीवादी लोकांवर कायदेशीर कारवाई करावी गुन्हे दाखल करण्यात यावे.
व मागासवर्गीय घरकुल मंजूर करून त्यांना बांधकामाच्या आदेश देण्यात यावे तसेच लोणी गावातील मागासवर्गीयांच्या स्मशानभूमीवर गावातील जातिवादी लोकांनी अतिक्रमण करून पक्के घर बांधले आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करून ग्रामपंचायतीने त्वरित अतिक्रमण काढण्याची कारवाई करावी.
स्मशानभूमी ला तारेचे कंपाउंड करून स्मशानभूमी मागासवर्गीयांच्या ताब्यात देण्यात यावी डोंगरगाव तालुका सिल्लोड औरंगाबाद येथील बौद्ध समाजातील आई आणि मुलीच्या निर्घुण खून करण्यात आला त्याचे आईवर अत्याचाराची घटना झालेली असताना काही राजकीय लोकांच्या दबावाखाली येऊन प्रशासनाकडून या घटनेला आत्महत्येचे स्वरूप देण्यात आले व आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करण्यात आले आहे.
या घटनेची शिवाय मार्फत चौकशी करून गुन्हेगाराला शोधून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे तसेच 14 वित्त आयोगातून मागासवर्गीयांसाठी राखिव असलेल्या निधीतून तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीतील तीन वर्षाचा सन 2017 -18 ;18- 19; व19 -20व्या वर्षात किती व कोणत्या कामावर खर्च केला या विषयी संपूर्ण तपशीलवार माहिती मिळावी तसेच नमुना नंबर 5 ची माहिती झेरॉक्स प्रत सहित मिळावे वसंत नगर येथील मागासवर्गीय शेतकऱ्यांचे विज कनेक्शन खंडित करणाऱ्या जातीवादी विज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल करून मागासवर्गीय शेतकऱ्यांचा विजपुरवठा सुरू पूर्ववत करावा तालुक्यातील वर्षानुवर्ष गायरान व वन विभागाच्या जमिनी दलित भुमिहीन शेतकरी आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कसत आहेत त्यांच्या ताब्यातील जमिनी त्यांच्या नावावर करून देण्यात याव्यात जैवविविधता नोंदवह्याचे काम न करणाऱ्या ग्रामपंचायतीवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी जामनेर शहरातील भूमिगत गटारी चे काम अतिशय नित्कृष्ट दर्जाचे आहे शहरातील काही भागात गटारीचे चेंबर खराब झाल्याने पाणी रस्त्यावर घाण साचून दुर्गंधी पसरून घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहेत त्यामुळे शहरातील लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही तरी सर्व कामांची चौकशी करून संबंधित ठेकेदाराला काम काढून घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे.
या सर्व मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने जामनेर तहसिल समोर सर्व कार्यकर्त्यांचा उपोषणास बसले आहे .
यावेळी भगवान पंडित सोनवणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवा अध्यक्ष जळगाव यांच्या नेतृत्वाखाली उपोषणाला सुरुवात झाली आहे.