<
जळगांव(प्रतिनिधी)- दिनांक २७ फेब्रुवारी २०२० पासून आयकर विभागाचे अधिकारी हे जैन इरिगेशन सिस्टिम्स ली. चे जळगाव स्थित मुख्य कार्यालय, विविध कारखान्यात नियमित असलेले सर्च आणि सर्व्हे साठी आलेले आहेत त्यांना कंपनीचे व्यवस्थापन व सर्व ठिकाणचे सहकारी सहकार्य करीत आहे. तसेच कंपनीचे सर्व उत्पादने व व्यवहार सुरळीत व नियमित सुरू आहेत. असे कंपनीच्या वतीने एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविण्यात आले आहे.