Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगांव मधे रोबोटीक हँड शिबीर-मराठी प्रतिष्ठान चा सामाजिक उपक्रम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/02/2020
in विशेष
Reading Time: 2 mins read

कृत्रिम हात (रोबोटीक हँड) लावा, गेलेला आनंद परत मिळवा

जळगांव-(प्रतिनिधी) – रेल्वे अपघातात,मोटर अपघात किंवा अन्य कारणाने ज्यांचे हात कोपरा पासून किंवा कोपराच्या वर पासून कापले गेले असतील अथवा जन्मतः हात नसतील अशा व्यक्तींना कृत्रिम हात लावण्याचे शिबिर प्रथमच जळगांव शहरात आयोजित करण्यात येत असून त्या करीता गरजू व्यक्तींची नाव नोंदणी दि.१ मार्च ते १५ मार्च२०२० पर्यंत करण्यात येणार आहे. शिबिर एप्रिल महिन्यात घेण्यात येणार आहे.

भारतात दरवर्षी ४० हजार लोकांचे विविध कारणाने हात कापले जातात. कृत्रिम हाताची किंमत जास्त असल्याने अनेक लोकं असे हात बसवू शकत नाही.म्हणून सामाजिक जबाबदारी समजून प्रतिष्ठान शिबिराचे आयोजन करत आहे.

कसा आहे कृत्रिम हात

कृत्रिम हात पुर्णतः इलेक्ट्रॉनिक हात आहे.
१२ वॅट बॅटरी वर ८ तास हाताची हालचाल करता येते.
१० किलो पर्यंत वजन उचलता येते.सहज लावता येतो.दोन वर्षांची वॉरंटी असेल.

लाभार्थी कसे होता येईल

दारिद्य्र रेषेखालील व्यक्तींना शिबिरात कृत्रिम हात निःशुल्क लावले जातील. आर्थिक सक्षम असलेल्या व्यक्तींना कमी दरात कृत्रिम जात लावले जातील.

शिबिराचा लाभ फक्त जळगांव जिल्ह्यातील व्यक्तींनाच घेता येईल

सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींनी या उपक्रमात सहभाग नोंदवावा

मराठी प्रतिष्ठान लोकवर्गणीतुन व लोक सहभागातून समाज उपयोगी प्रकल्प राबवते ज्याचा मुळे समाजातील अनेक लोकांच्या जीवनात आनंद येईल हा एकमेव उद्देश असतो. म्हणून सहभागी व्यक्ती व संस्था यांचे स्वागत असेल.

नाव नोंदणी करीता लागणारे कागदपत्रे

आधार कार्ड,पोस्ट कार्ड साईझ फोटो, दारिद्र्य रेषे खालील व्यक्ती असल्यास पिवळे कार्ड(ओरिजिनल) व त्याची झेरॉक्स,बँक पास बुक चे सहा महिन्यांचे स्टेटमेंट,मोबाईल नंबर.

खालील ठिकाणी नाव नोंदणी करता येईल

१)देशपांडे मोटर ड्रायव्हिंग स्कूल, आर टी ओ ऑफिस समोर, गणपती नगर,जळगांव
२)विजयकुमार रामदास वाणी, नवी पेठ,जळगांव
३)खुशल ऑटोमोबाईल, कालिका माता मंदिर रोड, जळगांव
४)ग्लोबल मीटर सर्व्हिसेस, रेड क्रॉस समोर, बी जे मार्केट,जळगांव.

सूचना- १५ मार्च नंतर नाव नोंदणी केली जाणार नाही.
शिबिराची चौकशी मोबाईल वर करू नये ही नम्र विनंती. तसेच याा शिबीराचा लाभ गरजूंनी घेण्याचे आवाहन मराठी प्रतिष्ठान, जळगांव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जैन इरिगेशन कंपनीचे सर्व उत्पादने व व्यवहार सुरळीत व नियमित-जैन इरिगेशन सिस्टिम्स

Next Post

वधू वर सूचक मंडळ आणि वृद्धाश्रम- सागर तायडे

Next Post

वधू वर सूचक मंडळ आणि वृद्धाश्रम- सागर तायडे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo