<
जामनेर-(अभिमान झाल्टे) – तोंडापूर ता जामनेर तोंडापूर येथील शेतकरी भावराव आनंदा अपार यांनी स्वत:च्या शेतातील विहिरीत दि २४ /११ /२०१९ रोजी आत्महत्या केली होती. आज रोजी दि.27 जामनेर तहसीलदार अरुण शेवाळे यांच्या हस्ते एक लाख रुपयाचा सानुग्रह अनुदान चेक पत्नी अनुसयाबाई भावराव अपार यांना देण्यात आला.
सविस्तर वृत्त असे की तोंडापूर येथील शेतकरी भावराव अपार यांनी स्वताच्या शेतातील विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली, त्याच्या वारसांना जिल्हाधिकारी 47जळगाव ( तंचाई शाखा) यांच्या आदेशानुसार मासिक प्राप्ती योजने अंतर्गत सानुग्रह अनुदान गुंतवणुक रक्कम एक लाख रुपयाचा धनादेश मंजुर झाल्याने त्याचे वितरण आज दि २७ रोजी तहसिलदार अरुण शेवाळे यांच्या हस्ते पत्नी अनुसयाबाई भावराव अपार यांना देण्यात आला,
याठिकाणी सामाजीक कार्यकर्ते जितेंद्र पाटील राम अपार तलाठी शिवाजी काळे उपस्थित होते.