<
जळगाव – (प्रतिनिधी) – रोटरीच्या माध्यमाने, व रोटरी परिवारातील महिलानी स्वकर्तृत्वाच्या बळावर केलेल्या अभिमानास्पद व गौरवास्पद कार्याबद्दल रोटरी जळगाव ईस्टच्या वतीने आज नारी रत्न पुरस्कार देण्यात आले.
हे पुरस्कार व्यापार-उद्योग, सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक कला, या विविध क्षेत्रात कार्यरत असणारया या पुढील सुधा काबरा , उषा शर्मा, डॉक्टर अंजुम अम्रेलिवला , डॉक्टर सुमन लोढा, संगीता पाटील, डॉक्टर काजल फिरके , मीनल विजय राठी , संगीता घोडगावकर ,यडॉक्टर दर्शना शहा , डॉक्टर मयुरी पवार , डॉक्टर वैजंती पाध्ये , रेखा कोठावदे-पाटील , प्रीती चोरडिया, समृद्धी रडे, योगिता ढाके ,सोनल गांधी , फातिमा रजकोटवाला, मनीषा मल्हारा ,कल्पना पलोड, डॉक्टर प्रियंका बंबंसाळी ,डॉक्टर श्रद्धा चांडक मनीषा पाटील ,काजल वारके ,काजल मेहता, अर्चना पवार रोटरी परिवारातील महिला सदस्यांना प्रदान करण्यात आला. हे पुरस्कार उत्कृष्ट संसदपटु माननिय खासदार सूप्रियाताई सुळे यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आले. रोटरी च्या महिलांद्वारे जगभरात शांततेसाठी जनजागृती व्हावी, त्यांच्या ऊत्कृश्ट कार्याच गौरव होउन त्याना प्रोत्साहन मिळावे, व दुसर्या महिलांना प्रेरणा मिळावी ह्या हेतूने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत आज हा पुरस्कार सोहळा घेण्यात आला.
हा भव्य पुरस्कार सोहळा गणपतीनगर येथील रोटरी हाल येथे रोटरी परीवाराच्या सर्व 6 क्लबच्या सदस्यांच्या उपस्थितीत पार पडला. या वेळी प्रामुख पाहुणे सुप्रियाताई सुळे, माजी आमदार गुलाबराव देवकर, अभिषेक पाटील, रविंद्र भैया पाटील, राम पवार, रोटरीचे तुषार फिर्के, अनिल अग्रवाल उपस्थीत होते.
या वेळी सुप्रियाताइनी रोटरी तील महिलाच्या कार्याच गौरव करित म्हणाले की राष्ट्रिय व जागतीक शान्ततेसाठी रोटरीतील महिला करित असलेल्या जनजागृतीपर कार्य अभिनंदनीय आहे. त्याचवेळी त्यानी कुपोषन निर्मुलनाच्या च्या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाची सुरवात उपस्थीत पाहूण्याच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. रोटरी ईस्ट चे अध्यक्ष विनोद भोईटे-पाटील ,फस्ट लेडी रेखा पाटील व सचिव वीरेंद्र छाजेड यानी सर्वाचे स्वागत केले. संजय गांधी यानी प्रास्ताविक सादर केले. उपस्थीताचे आभार प्रदर्शन राहुल भन्साली यानी मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुजाता मुनोत व वैजयन्ती पाध्ये यानी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प प्रमुख संजय गांधी, राहुल भन्साली डॉक्टर जगमोहन छाबडा प्रनव मेहता, संग्राम सुर्यवशि, भाग्यश्री शर्मा यानी परिश्रम घेतले.