<
रोटरी स्टारने मिळवून दिला सर्कस पाहण्याचा आनंद
जळगाव – गेल्या काही दिवसांपासुन नेरी नाका परिसरात”भारत सर्कस” सुरु आहे, सुधर्मा संस्थाध्यक्ष श्री . हेमंत बेलसरे यांनी संस्थेच्या गरीब विद्यार्थ्यांना सर्कस दाखविण्याबाबत रोटरी स्टारचे अध्यक्ष सागर मुंदडा यांना विनंती केली होती. त्यांनी यासाठी ताबडतोब पुढाकार घेऊन सुधर्माच्या एकूण 65 गरीब विद्यार्थ्यांना सर्कस दाखविली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुधर्मा संस्थाध्यक्ष हेमंत बेलसरे यांनी प्रमुख अतिथी डॉ . तुषार फिरके
( असि . गव्हर्नर ) रोटरी यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन केले . तसेच रोटरी स्टारचे अध्यक्ष श्री . सागर मुंदडा, सचिव श्री .करण ललवाणी, धनराज कासट, अखिल मंडोरा, जीनल जैन आदि . सदस्यांचे स्वागत अनुक्रमे पुष्पगुच्छ देऊन सुधर्माचे सदस्य श्री .दिनकर बावीस्कर, श्री .नानाभाऊ चव्हाण, श्री . राजेंद्र चौधरी व श्री.सूर्यकांत हिवरकर यांनी केले .
सर्कस बघण्यासाठी सुधर्माचे, मन्यारखेडा ,खेडी खुर्द, सावखेडा बु॥, राजीव गांधीनगर, नशिराबाद, समता नगर झोपडपट्टी येथील 65 मुले आली होती. विदुषकांच्या गमतीजमती, झुल्यावरील चित्तथरारक कसरती, सामूहिक कसरतींचे खेळ, मौत का कुआँ मधील गरगर गोल फिरणारी मोटरसायकल,कुत्र्यांच्या कसरती पाहुन मुले टाळ्या वाजवून दाद देत होती. रोटरी स्टार तर्फे मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. या कार्यक्रमाचा आनंद लुटतांना मुलांना सर्कस संपूच नये असे वाटत होते . कार्यक्रमाचे शेवटी श्री . राजेंद्र चौधरी सर यांनी रोटरी स्टारच्या सर्व सदस्यांचे आभार मानले . याप्रसंगी दिनकर बाविस्कर,सुर्यकांत हिवरकर, नानाभाऊ चव्हाण, राजेंद्र चौधरी, सुनीता श्रेयस बेलसरे इ. हजर होते.