<
जळगाव – के.सी.ई.सोसायटीच्या मू.जे.महाविद्यालयाच्या इव्हेंट मॅनेजमेंट विभाग व कुसुम लक्ष्मी मेमोरियल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘खान्देश सन्मान 2020’ या कार्यक्रमाचे मू.जे. महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान ४० सन्मानार्थींना खान्देश पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून खा. उन्मेश पाटील, आ. सुरेश भोळे, आ. मंगेश चव्हाण, टी.एम.ई. सोसायटी फैजपूरचे अध्यक्ष शरद महाजन, डॉ.राधेशाम चौधरी, उदयसिंह पाटील, उद्योजक श्रीराम पाटील, उद्योजक नयन गुजराती, प्रा. संदीप केदार उपस्थित होते.
के.सी.इ. चे जनसंपर्क अधिकारी प्रा. संदीप केदार यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन वैशाली पाटील तर प्रिया दळवी आणि निलेश पाटील यांनी आभार मानले.प्रिया बुरुकले, महेश सुर्वे, मनाली अडवाणी, हर्षल सोनवणे, नृत्यकला विभाग मु.जे. महाविद्यालय, उडान फाउंडेशन यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून कार्यक्रमात रंग भरला. कार्यक्रमास विभागप्रमुख पंकज कासार यांचे विशेष मार्गदर्शन लाभले तर सर्व इव्हेंट मॅनेजमेंट च्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
पुरस्कारार्थी मान्यवर –
पत्रकारिता – डॉ. राहुल रणाळकर (संपादक, दै.सकाळ), सागर दुबे (उपसंपादक ,दै.लोकमत) धनश्री बागुल (उपसंपादक ,दै.दिव्य मराठी) पोलीस दल- मंजुला तिवारी, वर्षा गायकवाड वकील – ऍड. राजेश झाल्टे, ऍड. स्वाती निकम सांस्कृतिक – मोहन तायडे (संचालक, मेलडी सुपरहिट ऑर्केस्ट्रा) अमर राजपूत, विनोद ढगे, कला – शाहीर शिवाजी पाटील, राजेंद्र सोनार सामाजिक –उज्वला देवरे, सुमित्रा महाजन, पल्लवी भोगे पाटील, सुधा काबरा, उषा शर्मा, पुरुषोत्तम न्याती, हर्षाली चौधरी (उडान फौंडेशन) डॉक्टर – डॉ गौरव महाजन शैक्षणिक – सुनील चौधरी ,प्राचार्य भीमराव पाटील(एम एम कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पाचोरा) किरण जरवानी साहित्यिक – विनायक त्र्यंबक पाटील, आरोग्यसेवा- पितांबर भावसार ,राहुल सूर्यवंश व्यावसायिक – बालेश कोतवाल कृषी –शिवाजीराव हाडपे (चाळीसगाव ग्रामसेविका – रुबियाना तडवी विशेष सन्मान –अजय दामू पाटील( भुसावळ) डिजिटल मीडिया – गिरीश नारखेडे, आधी समानार्थी ना खानदेश सन्मान देऊन गौरविण्यात आले.