<
जामनेर येथे सर्वात जास्त महिलांनी घेतला सहभाग
जामनेर-(अभिमान झाल्टे) – येथे ब्राह्मण महासंघ महिला दिनाचे औचित्य साधत महिला मेळावा आयोजन करण्यात आले होते.
आयोजित सर्व धर्मीय, सर्व शाखीय जळगाव जिल्हा जामनेर तालुका चा भव्य रोजगार महिला मेळावा दिनांक १/३/२०२० . रविवार जामनेर येथे पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे डॉ.प्रशांत जी भोडे. व्ही .पी .पाटील सर. ब्राह्मण महासंघ कार्ध्यक्षा स्मिता कुलकर्णी.ब्राह्मण महासंघ प्रदेश संपर्क प्रमुख माधुरी कुलकर्णी, ब्राह्मण महासंघ ब्रह्मसेवक किशोर जोशी ( चौधरी ), ब्राह्मण महासंघ बोदवड तालुका अध्यक्षा श्रीमती दीपाली कुलकर्णी, बोदवड तालुका उपाध्याक्षा निशा भास्कर जोशी, भारती काळे, शितल दलाल.
प्रथम दीप प्रजवलन व सरस्वती प्रतीमा पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रारंभी ब्राह्मण महासंघ बीड येथील मार्गदर्शक राष्ट्रीय किर्तनकार भरतबुवा रामदासी.हिंगणघाटव लासलगाव जळीतकांड महिला,ज्ञात अज्ञात समाज बांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. डॉ.प्रशांत भोडे यांनी ब्राह्मण महासंघाच्या उपक्रमा बदल कौतुक केले व भविष्यात ब्राह्मण महासंघाच्या कार्यास खुप खुप शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शका ब्राह्मण महासंघ प्रदेश कार्यादक्षा स्मिता कुलकर्णी यांनी महिलांना विचाराकडून व्यवसायाकडे, व्यवसायातून समृद्धीकडे असा विषय मांडला.विचार सक्षम , समृद्ध असावा रोजगाराच्या संधी बचत गट माहिती स्मिता ताईंनी दिली धर्म जात पंथ यापुढे जाऊन हिंदू म्हणून एकत्र येऊन काम करावे आणि ही वैचारिक जपणूक महासंघ करीत आहे.संघटीकरण सक्षमीकरण यावर पंचेचाळीस मिनिटे मार्गदर्शन केले. महासंघाची माहीत महिलांना देण्यात आली. प्रदेश संपर्क प्रमुख माधुरी कुलकर्णी यांनी कॅन्सर महिलांना रोजगार विषयक मार्गदर्शन केले ब्रह्यसेवक किशोर जोशी यांनी महिलांना रोजगार संधी उपलब्धता, भांडवल मार्केट यावर मार्गदर्शन केले.प्रत्येक क्षेत्रात महिलांनी सक्रिय व्हावे.सर्व प्रथिने ब्राह्मण महासंघ त्यांना सहकार्य करेल असे सांगण्यात आले. शासकीय योजना महिलांना मिळाव्यात यासाठी प्रयत्न करु असे अनेक विषय मांडण्यात आले.
भारती काळे यांनी पॅरामेडिकल कोर्सेसची माहिती व महिलांना रोजगार विषयक मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ब्राह्मण प्रदेश संपर्क प्रमुख माधुरी कुलकर्णी. किशोर जोशी. दीपाली कुलकर्णी निशा जोशी यांचे मोठे योगदान आहे .या कार्यक्रमास बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.प्रिती कुलकर्णी , वर्षा परदेशी , पुष्पा कोळी , दिपाली पाटील शोभाबाई लोखंडे , संकीता आणि या कार्यक्रमाचे आभार शितल दलाल यांनी मानले.