<
जळगाव : मेहरूण येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयात मंगळवारी “आॅरेंज कलर डे” साजरा झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी आॅरेंज ( नारिंगी ) रंगाचे कपडे परिधान करीत अंका ऐवढे दगड चौकोनात ठेवणे या खेळांमध्ये सहभाग घेतला.
सुरुवातीला विद्यार्थ्यांना आॅरेंज रंगाविषयी माहिती सांगत किरण पाटील यांनी नारंगी रंग हा ऊर्जा व प्रेरणा देणारा रंग आहे असे सांगितले. विद्यार्थ्यांसाठी बादलीत दगड जमा करणे स्पर्धा यावेळी घेण्यात आली. स्पर्धेत प्रथम यश घोडेराव, सुवर्णपदक द्वितीय आरुषी मोहरकर रौप्य पदक, तृतीय आराध्या शाह या विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्र मिळविले. या विद्यार्थ्यांना श्री संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळाचे सचिव तथा उपशिक्षक मुकेश नाईक यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी मुलांनी जेवणाच्या डब्यात आॅरेंज रंगाचा खाऊ आणला होता. यात नारिंगी भात , गाजर हलवा, जिलेबी, मोतीचुरचे लाडु , केसरीपेढे , बिस्किट, शिरा , असा समावेश होता. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका शीतल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. विद्यालयातील शिक्षक कविता बढे, शोभा सपके, गीता भावसार, रोहिणी शिंदे, सरीता परदेसी, सुरेखा चौधरी,वैशाली विधुर आम्रपाली शिरसाठ, छाया केदार, हर्षा काळे, तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.