<
पाळधी/धरणगांव(प्रतिनीधी)- सूर्या फाऊंडेशन संचलित, नोबल इंटरनॅशनल स्कुल पाळधी येथे भव्य अशा साई बाबा मैदानात शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन अविष्कार २०२० मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे सभापती मा. मुकुंद नन्नवरे, उद्योगपती शरदजी कासट, शिवसेना महिला प्रमुख महानंदताई पाटील, स्वामी समर्थ ग्रुपच्या संचालिका प्रतिक्षा पाटिल, हर्षाली पाटील, मौलाना आझाद फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोज शेख, पत्रकार चेतन निंबोळकर, आधार गुरुजी, पल्लवी पाटील, अनिल कासट, प्रसाद शिंदे, राहुल ठाकुर, बुलडाना बँकेचे रमेश पवार, स्कुलच्या अध्यक्षा अर्चना सूर्यवंशी व प्रशांत सूर्यवंशी यांच्या सह विविध मान्यवर उपस्थित होते. यात सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करून दिपप्रज्वलन करण्यात आले. व भारतीय परंपरे नुसार अतिथींचे सत्कार करून सांस्कृतीक कार्यक्रम सादर करण्यात आले. ज्यात नर्सरी ते ५ वीच्या विद्यार्थ्यांनी विविध मनोरंजक व संदेशातमक कार्यक्रम सादर केले. यात उखाणा, हास्य नाटिका, पोवाडा, पुलवामा हल्ला, स्वच्छ भारत अभियान असे विविध विषयांवर सांस्कृतीक कार्यक्रम सादर करण्यात आले. प्रसंगी चिमुकल्यांनी आपले कलागुण सादर करत उपस्थितांची मने जिंकली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक योगेश करंदीकर, उज्वला झवर, गुणंवंत पवार, विजया मोरे, अश्विनी ठाकरे, राधिका उपाध्याय, सुवर्णा पवार, यांच्या सह शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.