<
पुणे-(प्रतिनिधी-) पद्मश्री पुरस्कार हा माझा नसुन काळ्या मातीचा आहे. पत्रकारांनी पुण्यात केलेला सत्कार आयुष्यातील महत्वाचा आहे. असे मत नुकताच ‘पद्मश्री’ पुरस्कार प्राप्त झालेल्या बिजमाता राहिबाई पोपेरे यांनी व्यक्त केले.
तसेच ‘महाराष्ट्र केसरी’ हे जिवनाचे अंतिम ध्येय नसुन देशाला ऑल्मपिंकचे सुवर्णपदक मिळवून देणे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने पुणे येथील सिध्दार्थ हॉल येथे आयोजित कार्यक्रमात बिजमाता रहिबाई पोपेरे यांना ‘पद्मश्री’ व हर्षवर्धन सदगीर यांना ‘महाराष्ट्र केसरी’ किताब मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संघटक शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते पैलवान संजय भोकरे, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्याहस्ते रहिबाई पोपेरे यांना पुणेरी पगडी, शाल, सन्मानपत्र देऊन तर पै. हर्षवर्धन सद्गीर यांना चांदीची गदा, श्रीहनुमान यांची मुर्ती, सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर राज्य वृत्तवहिनी मुंबई संघाचे अध्यक्ष रणधीर कांबळे, ग्रामीणचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत, पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष राकेश टोळ्ये, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र वाघमारे, सोमनाथ देशकर, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख संदीप भटेवरा, सहचिटणीस सुरेखा खानोरे, प्रदेश प्रसिद्धीप्रमुख नवनाथ जाधव, नागपूर विभाग प्रमुख महेश पानसे, प्रदेश विदर्भ उपाध्यक्ष संदीप पांडव, निळकंठ कराड यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी राहिबाई पोपेरे यांनी सांगितले की, आज देशाला सेंद्रिय शेतीचे महत्व कळाले असून देशी वाणांचे बियाणे जतन करीत या बियाणांची बँक तयार झाली. बायफच्या माध्यमातून हे कार्य आज जगापुढे उभे केले. माझ्यासरख्या अशिक्षित महिलेला हा पद्मश्री पुरस्कार मिळाला. लोकांनी हायब्रिड शेतीमाल पिकविण्यापेक्षा आता देशी वाणाला महत्व दिले पाहिजे. आपले आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी देशी वाणांचे उत्पादन केले पाहिजे. माझे हे काम पत्रकारांच्या लक्षात आल्यानंतर त्याला प्रसिध्दी मिळत गेली. माझ्या या यशात पत्रकारांचेही मोठे योगदान आहे.
यावेळी बोलताना पै. सदगीर म्हणाले की, माझे हे सर्व यश माझ्या वडिलांचे असून त्यांनी ही प्रेरणा मला दिली. घरची परिस्थिती गरिबीची असल्याने कुस्ती सोडून सैन्य दलात भरती झालो. मात्र नोकरी हे अंतिम ध्येय नसल्याने देशासाठी आपल्याला काही तरी कामगिरी करायची अशी उर्मी मनात होती म्हणूण सैन्यातील प्रशिक्षण पुर्ण करुन नोकरी सोडून दिली, व आज 7 वर्षाच्या प्रयत्नांनतर महाराष्ट्र केसरी झालो. युवकांनी प्रेरणा घेवून कुस्तीत यावे असेही आवाहन त्यांनी केले.
संजयजी भोकरे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की, आदिवासी समाजातिल महिला बिजमाता राहिबाई यांना पद्मश्री तर त्याच आदिवासी तालुक्यातील पहिलवान महाराष्ट्र केसरी मिळवतो ही निश्चित अभिमानाची गोष्ट असुन अशा लोकांना सन्मानित करण्याचे काम पत्रकार संघाचे आहे. मी स्वत: कुस्तीपट्टू असल्याने ग्रामिण भागातून खेळाडू तयार व्हावेत अशी अपेक्षा आहे.
वसंतराव मुंडे यांनी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ हा ग्रामिण भागातील पत्रकारांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देणार असुन तालुका पातळीवर पत्रकारास गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून घरे देण्याचे काम करावयाचे आहे. तसेच प्रत्येक तालुक्यात पत्रकार भवन उभारण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. अधिस्विकृती पत्रकार, पत्रकारांना पेन्शन योजना लागु करण्यासाठी आपण शासनाकडे योग्य तो पाठपुरावा करु असेही त्यांनी यावेळी सांगितले. पत्रकार संघाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील संघटन करणारे व राज्यातील पत्रकारांसाठी आपल्या सर्वांसाठी न्याय देणारे एकच नेतृत्व आज पाहावयास मिळते. यांनी ग्रामीण भागातील पत्रकारितेला व ग्रामीण भागातील पत्रकारांना मोठे करण्यासाठी योगदान दिले ते संजय भोकरे यांच्या रूपाने हेच अनेक पत्रकारांना आपल्या हक्काचे व्यासपीठ त्यांनी तयार करून दिले.
तसेच संघटनेमध्ये काम करत असताना सर्वांना बरोबर घेऊन जात असताना कोणाच्या बरोबर व कुणाला कोठे वेळप्रसंगी मदत करावी हे त्यांनी राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून दाखवून दिले राज्य पत्रकार संघाच्या राज्यस्तरीय पदाधिकारी बैठकीत सर्व पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष यांनी या पुढील काळात काम करत असताना आपण या समाजाचे काहीतरी देणे लागतो. या सामाजिक उपक्रमातून काम करावे मी या अध्यक्षपदावर विराजमान झाल्यानंतर अनेकांनी ही खुर्ची काटेरी असल्याचे सांगितले. मात्र या खुर्चीवर मी बसला असलो तरीही तुम्ही मला कितीही काटे टोचले तरीही ते काटे पुन्हा मी तुम्हाला टोचेल, त्यामुळे प्रत्येकाने आपले काम करत असताना गटबाजीला प्राधान्य न देता सर्वांना न्याय कसा देता येईल यासाठी प्रयत्न करावेत. यावेळी राज्यभरातील सुमारे 300 पदाधिकारी उपस्तीथ होते. तर यावेळी सुत्रसंचालन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे उत्तर नगर जिल्हा, अनिल रहाणे यांनी यांनी तर आभार प्रर्दशन प्रदेश प्रसिध्दी प्रमुख नवनाथ जाधव यांनी मानले.
यावेळी गोवा संपर्क प्रमुख शिवाजीराव नेहे, मंत्रालय संपर्क प्रमुख नितीन जाधव, उ.महा.संपर्क प्रमुख सुभाष डोके , अमरावती विभाग प्रमुख सिध्दार्थ तायडे, जळगाव, धुळे, नंदुरबारचे विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, पश्चिम महाराष्ट्र सहचिटणीस बाजीराव फराकटे, कोकण विभागीय अध्यक्ष भगवान चंदे, मराठवाडा विभागीय संपर्क प्रमुख अशोक देढे आदींसह वैभव स्वामी (जिल्हाध्यक्ष, बीड), प्रकाश साळवे (जिल्हाध्यक्ष, परभणी), सीताराम लांडगे (जिल्हाध्यक्ष,पुणे), प्रमोद मोकाशे (जिल्हाध्यक्ष, लातुर), गणेश जोशी (जिल्हाध्यक्ष, नांदेड), नयन मोंढे (जिल्हाध्यक्ष,अमरावती), बिरेंद्र चौभे (जिल्हाप्रमुख, यवतमाळ), प्रवीण सपकाळे (जिल्हाध्यक्ष,जळगाव), सचिन सोणवणे (जिल्हाध्यक्ष, नंदुरबार ग्रामीण), इरफान खान (जिल्हाध्यक्ष, ग्रामीण गडचिरोली), प्रवीण कांबळे (जिल्हाध्यक्ष ग्रामीण, सातारा), प्रद्दुम्न गिरीकर (जिल्हाध्यक्ष, हिंगोली), सुनिल बुकडे (जिल्हाध्यक्ष, चंद्रपुर), सारीका पाटील (जिल्हाध्यक्ष, रायगड), दिगंबर गुजर (जिल्हाध्यक्ष, जालना), प्रदिप शेंडे (नागपुर शहराध्यक्ष), वसंत डामरे (नागपुर ग्रामीण जिल्हाध्यक्ष), गणेश सुरजुसे (अकोला ग्रामीण जिल्हाध्यक्ष), राधेशाम भेंडारकर (जिल्हाध्यक्ष, गोंदिया), सुनील बनसोडे (जिल्हाध्यक्ष,उस्मानाबाद), दत्ता पाचपुते (जिल्हाध्यक्ष, अ.नगर दक्षिण), नितीन शिंदे (उत्तर- पुणे जिल्हाध्यक्ष), अनिल रहाणे (उत्तर नगर जिल्हाध्यक्ष), प्रशांत क्षीरसागर (जिल्हाध्यक्ष, औरंगाबाद ग्रा.), निलेश डिंगणकर (जिल्हाध्यक्ष,रत्नागिरी), सिताराम गावडे (जिल्हाध्यक्ष,सिंधुदुर्ग), राजेंद्र बोडके (जिल्हाध्यक्ष,नवी मुंबई), प्रमोद पानबुडे (जिल्हाध्यक्ष,वर्धा), शेखर जोशी (जिल्हाध्यक्ष,सांगली), गणेश पवार (सांगली ग्रामीण जिल्हाध्यक्ष), प्रवीण बुरांडे (औरंगाबाद महानगर प्रमुख), अॅड. रचना भालके (शहर जिल्हाध्यक्ष, ठाणे), लक्ष्मण डोळस (ग्रामीण जिल्हाध्यक्ष,नाशिक), दिलीप कोठवदे (शहर जिल्हाध्यक्ष,नाशिक), नितीन बिबवे (शहर जिल्हाध्यक्ष पुणे), सुर्यकांत नेटके (शहर जिल्हाध्यक्ष, नगर), महादेव डोंबे (शहर जिल्हाध्यक्ष, लातुर), नयन कच्छी (शहराध्यक्ष, कोल्हापूर), सुनिल पुनवटकर (शहर जिल्हाध्यक्ष, यवतमाळ), रुपराज वाकोडे (शहर जिल्हाध्यक्ष, गडचिरोली), शांताराम मगर (औरंगाबाद उत्तर जिल्हाध्यक्ष), सतिष सावंत (सोलापूर ग्रामीण), चंद्रकांत पवार (सातारा शहर जिल्हाध्यक्ष), जितेंद्रसिंह रजपुत (धुळे जिल्हाध्यक्ष), अमित कंदहार (जिल्हाध्यक्ष, अकोला), पंकज गाडेकर (वाशिम शहर जिल्हाध्यक्ष), सुनिल ऐतनगरकर (वाशिम ग्रामीण जिल्हाध्यक्ष), अजय मेश्राम (भंडारा शहर जिल्हाध्यक्ष), नरेश पाटील (पालघर जिल्हाध्यक्ष) यांसह राज्यातील सर्व तालुक्याध्यक्ष मुरबाड तालुकाध्यक्ष अरुण गायकर, संगमनेर तालुका अध्यक्ष सोमनाथ काळे, अकोले तालुका अध्यक्ष अशोक उगले, पाथर्डी तालुकाध्यक्ष तुळशिदास मुखेकर, नेवासा तालुकाध्यक्ष मोहन गायकवाड, जामखेड तालुकाध्यक्ष ओंकार दळवी, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष अंकुश शिंदे, शिरुर तालुकाध्यक्ष संतोष शिंदे, शेवगाव तालुकाध्यक्ष दादासाहेब डोंगरे, दौंड तालुकाध्यक्ष अब्बास शेख, इंदापूर तालुकाध्यक्ष निळकंठ मोहिते, जुन्नर तालुकाध्यक्ष रविंद्र भोर, आंबेगाव तालुकाध्यक्ष समीर पठाण, हवेली तालुकाध्यक्ष महेश फलटणकर, तुळजापूर तालुकाध्यक्ष अरुण लोखंडे यांसह राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित होते.
पै. हर्षवर्धन सदगीर सारख्या अनेक पैलवानांनी राज्याचे नाव मोठे केले असल्यामुळे शासनाने या खेळाडूंना शासकीय नोकरीत सेवा द्यावी. यासाठी मी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृह मंत्री अनिल देशमुख यांच्याबरोबर राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून नक्कीच पुढाकार घेईल असे मत शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त तथा अंबाबाई तालीम शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष पैलवान संजय भोकरे यांनी काल बोलताना सांगितले.