<
जळगाव(प्रतिनिधी):-वन्यप्राणी आणि इतरही घटकांची शिकार व चोरटा व्यापार यांचे प्रमाण वाढू लागले होते की त्यांपैकी बरेचसे कायमचे नष्ट होतात की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. याबाबत जागृती करण्यासाठी युनो म्हणजेच संयुक्त राष्ट्रसंघाने ३ मार्च वन्यजीवन दिवस ठरविला.याविषयी समाजात वन्यजीवांबद्दल जनजागृती व्हावी या उद्देशाने प्रगति विद्यामंदिर शाळेत जागतिक वन्यजीव दिवस साजरा करण्यात आला.या उपक्रमाचे आयोजन व नियोजन शिक्षक मनोज भालेराव यांनी केले.यात त्यांनी विद्यार्थ्यांकडून त्यांना माहित असलेल्या वन्यजीवांची नावे लिहून घेतली.विविध वन्यजीवांची चित्रे दाखवून त्यांची ओळख करून दिली.त्यांचे निसर्गातील महत्व सांगितले.त्यांची शिकार करने,चोरी करने कशा पद्धतीने चुकीचे आहे.हे सर्व पटवून दिले.मुख्याध्यापक शोभा फेगडे यांनी विद्यार्थ्यांना वन्यजीव यांच्याबद्दल सहानुभूती ठेवयला हवी या शब्दात महत्व सांगितले.