<
कासोदा ता.एरंडोल-( सागर शेलार )-दि.३ मार्च २०२० रोजी महाराष्ट्रात दहावी च्या परीक्षेला सुरुवात झाली.कासोदा केंद्रात साधना मा.विद्यालय , हाजी एन.एम.सय्यद उर्दू हायस्कूल , शहजादी उर्दू हायस्कूल येथे बोर्डाची परीक्षा घेण्यात येत आहे. मराठीच्या पहिल्याच पेपर ला तालुक्यातील कासोदा येथे कॉफी पुरवणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
येथील परीक्षा केंद्रांवर अजब प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. येथे इ.१० वी ची परीक्षा सुरू असतांना परीक्षेदरम्यान केंद्रावर पोलिसांनी बाहेरून कॉपी पुरवणाऱ्यांना चांगलीच अद्दल घडवली.
कासोदा पोलीसांनी मुंबई पोलीस अधिनियम कलम 120 (ब) प्रमाणे कार्यवाही केली असून पहिल्याच दिवशी झालेल्या कार्यवाही मुळे कॉपी करणारऱ्यांना व कॉपी पुरावणाऱ्यांना चांगलाच दणका बसला आहे.पहिल्याच दिवशी केलेल्या कार्यवाही मध्ये पोलीसांनी शाळेच्या आवारातून काही टवाळखोर कॉपी बहाद्दरांना ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांना बोलवून नोटीस दिल्या असल्याचे स.पो.नि.रवींद्र जाधव यांनी सांगितले. तसेच परीक्षेच्या काळात गावातील संपूर्ण झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकने यांनी दिले असून त्या आदेशाला न जुमानता , काही झेरॉक्स दुकानधारकांनी आपले दुकाने सुरु ठेऊन जादा पैसे घेत असल्याचे लक्षात येताच त्या ठिकाणी जाऊन त्यांची झेरॉक्स मशीन जमा करून घेत , नोटीस बजावत असल्याचे सांगीतले. सदर कार्यवाही कासोदा सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.