<
सुवर्ण संधी….. ! मोफत आरोग्य तपासणी शिबीर
जागतिक महिला दिन म्हणजे महिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा. अशीच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातर्फे फक्त महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
गर्भवती महिलांसाठी खास योजना
गर्भवती महिलांसाठी विशेष योजना बाळंतपण व सिझर ते पण अगदी मोफत. याचबरोबर वंधत्व निवारण, संतती शस्त्रक्रिया टाका व बिनटाक्याची शस्त्रक्रिया, गरोदर महिलांना एमडी रेडीओलॉजीस्टकडून सोनोग्राफी तपासणीचे मार्गदर्शन केले जाईल.
गर्भाशयासंबंधीची तपासणी
दुर्बिणव्दारे गर्भाशयाची आतून तपासणी, गर्भाशयाचा टयुमर, गर्भपिशवी खाली सरकणे, गर्भाशयाचा कॅन्सर, गर्भपिवशी शस्त्रक्रिया बिनटाक्याची योनीमार्गाव्दारे, लघवीची पिशवी खाली सरकणे, गर्भाशयाच्या गाठी, अंडाशयाच्या गाठी, पांढर्या पाण्याची तपासणी, मासिक पाळीचा त्रास, एमएस स्त्रीरोग तज्ञांकडून तपासणी व मार्गदर्शन याचबरोबर खान्देशातील एकमेव अत्याधुनिक नवजात शिशुंसाठी अतिदक्षता विभाग उपलब्ध.
आरोग्याच्या योजना लागू मोफत तपासणी
शिबीरासाठी इएसआयसी, महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजना, आयुषमान भारत योजना लागू आहेत.
निष्णात, तज्ञ डॉक्टरांची टीम
स्त्रीरोग विभागात डॉ. माया आर्विकर, डॉ. शुभांगी चौधरी, डॉ. राहुल कातखडे, डॉ. जया सावरकर, डॉ. दीपीका लालवाणी, डॉ. पंकज पवार, डॉ. राधिका पवार अशी निष्णात आणि तज्ञ डॉक्टरांची टिम कार्यरत आहे.
अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा : – संगीता पाटील – ९३२६१५०००४