<
जळगांव(प्रतिनीधी)- भारतात सध्या दर तेहतीस सेकंदाला एक व्यक्ती मृत्युमुखी पडत आहे. खाण्यापिण्याच्या बदललेल्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव असलेला बैठा दिनक्रम, वाढलेला मानसिक तणाव आणि व्यसने या सर्व चुकीच्या जीवनशैलीमुळे ही परिस्थिती ओढवली आहे. केवळ हृदयरोगच नव्हे तर त्यास कारणीभूत ठरणारे मधुमेह, अतिरक्तदाब, लठ्ठपणा हे आजारही साथीच्या रोगाप्रमाणे घराघरांमध्ये पसरलेले आपल्याला दिसून येतात. शस्त्रक्रिया व औषधोपचार यावर भारतीयांचे कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. हे सर्व टाळणे नक्की शक्य आहे हे माधवबागच्या हजारो रुग्णांनी सिद्ध करून दाखवले आहे. अत्याधुनिक वैद्यकीय तपासण्या आयुर्वेदाचे ज्ञान आणि जीवनशैलीतील बदल यांची सांगड घालून बनवलेल्या या उपयुक्त पर्यायाची माहिती समाजातील जास्तीत जास्त लोकांना पुरवण्याची आवश्यकता आहे. याचसाठी माधवबाग विविधप्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करत असते. अश्याच एका “हार्दिक विजयोत्सव” या उपक्रमाचे आयोजन येथील माधवबाग व पु.ना. गाडगीळ अँड सन्स यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. यामध्ये माधवबागच्या उपचार पद्धतीने व्याधीमुक्त झालेल्या व निरोगी स्वस्थ आयुष्य जगणाऱ्या रुग्णांचा हार्दिक विजयोत्सव हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यावेळी, माधवबाग मुंबईचे सी.एम.ओ. डॉ. गुरुदत्त अमीन हे उपस्थित राहणार असून जमलेल्या सर्व रुग्णांना ते मार्गदर्शन करणार आहे. यावेळी माधवबागच्या उपचार पद्धतीने व्याधीमुक्त झालेल्या रुग्णांचा सन्मान देखील यावेळी करण्यात येणार आहे. या हार्दिक विजयोत्सवाचे आयोजन उद्या शुक्रवार रोजी शहरातील पु.ना.गाडगीळ अँड सन्सच्या सभागृहात सकाळी १० वाजता करण्यात आले असून, याचा लाभ सर्वांनी घ्यावा असं आवाहन जळगांव माधवबागच्या संचालिका डॉ. श्रद्धा माळी, डॉ. श्रेयश महाजन, अमित माळी(९९२३५२७९८०), जी.टी. महाजन(९४२२५६४७९८) यांच्यावतीने करण्यात आले आहे.
Great job