<
मुंबई(प्रतिनीधी)- अवघ्या १० महिन्यांची चिमुकली अलिझा ही हृदयरोगाने जन्मापासुनच त्रस्त होती. जन्मापासुनच हॉस्पिटलचा सहवास. हृदयाला होल अस्ल्याने तिची शारिरीक तथा मानसिक वाढ होत नव्हती वजन अवघे ३ किलो त्यात जन्मापासुन जरा सुद्धा वाढ झाली नव्हती. वजन कमी असल्याने कोणतेही डॉक्टर शस्त्रक्रिया करण्यास तयार होत नव्हते. त्यात तिच्या जिविताला जास्त धोका होता. पण शेवटी अलिझा ला काहीही करुन ठीक करायच या आशेने Asian Heart Hospital येथील डॉक्टर व अलिझाच्या पालकांनी जोखीम पत्करण्याचे ठरवले आणी मागच्या आठवड्यात अलिझावर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यात खुप साऱ्या विविध ट्रस्टमार्फत त्या पिडीतेच्या आई वडिलांना आर्थिक मदत करण्यात आली. त्यात छोटासा वाटा रीपरिवर्तन फाऊंडेशन मार्फत सुद्धा उचलण्यात आला, तसेच शस्त्रक्रियेनंतर अलिझाला श्वास घेण्यास त्रास होत होता म्हणून डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे ऑक्सिजन मशीन लावणे गरजेचे होते त्याची जबाबदारी रिपरिवर्तन फाऊंडेशनच्या वतीने संस्थेच्या अध्यक्षा सौ. वैशाली यांनी घेतली व चिमुकलीस ऑक्सिजन मशीन उपलब्ध करुन देण्यात आले. काल अलिझाला हॉस्पिटल मधुन घरी आणले म्हणून आज रिपरिवर्तन फाऊंडेशनच्या वतीने संस्थेचे उपाध्यक्ष सुशिलकुमार सावळे यांनी अलिझाच्या घरी जाऊन भेट घेतली व विचारपूस केली तसेच ऑक्सिजन मशीन व पुढील उपचारासाठी धनादेश सुपुर्द केला. संस्थेने केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
khup chan
manav seva hich ishwar seva
????????????????????????????