<
विद्यार्थ्यांनी घेतला नैसर्गिक रंग बनविण्याचा अनुभव
जळगाव(प्रतिनिधी)- येथील सरस्वती विद्या मंदिरात नैसर्गिक रंग बनविणे कार्यशाळा घेण्यात आली. रंगपंचमी या वेळी वापरले जाणारे केमिकल, रसायन मिश्रीत रंगाचा वापर विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी टाळावे. व वनस्पती पासून नैसर्गिक रंग बनवून वापर करावा. गुलाबाच्या पाकळ्या, झेंडूची फुले, कडुनिंबाची पाने, हळद, आरारूत पावडर, मुलतानी माती, यासारख्या विविध वनस्पतीचा वापर करून नैसर्गिक रंग बनविण्याचा प्रात्यक्षिक सुवर्णलता अडकमोल यांनी करून दाखविले तर नैसर्गिक रंग फायदे व केमिकल रंगापासून होणारे नुकसान यावर मार्गदर्शन सविता ठाकरे यांनी केले. केमिकल रंगामुळे विद्यार्थ्यांची त्वचा खराब होवु नये.रंग तोंडात जाऊन फुफ्फुसचा आजार, खोकला,दमा व मळमळ, डोळ्यांची जळजळ, या सारखे आजार होण्याची दाट शक्यता असते रंगांमधील घातक केमिकल्समुळे त्वचेच्या कॅन्सरचा धोकाही संभवतो, काही गडद रंगात लेड ऑक्साईड, कॉपरसल्फेट, मर्क्युरीसल्फाईट, अमोनिअम ब्रोमाईड या सारख्या आरोग्याला हानिकारक केमिकल्स वापरले जातात. या बाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. उपक्रमाचे आयोजन नियोजन सुवर्णलता अडकमोल, सविता ठाकरे यांनी केले तर ग. स. अध्यक्ष मनोजकुमार पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना वसाने यांच्या उपस्थित हा उपक्रम घेण्यात आला.