महाविद्यालयीन विद्यार्थी निवडणूकीत महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनने (मासु) दिला राज्यातील पहिला जी.एस.(G.S)

जळगाव:- जळगाव जिल्ह्यांतील एस.एस.मणियार विधी महाविद्यालय मध्ये गेल्या आठवड्यापासुन जी.एस.(G.S) पदांसाठी विद्यार्थी निवडणूकीचे वारे वाहत होते, आज दुपारी त्याचा निकाल बाहेर आला आहे आणि यामध्ये महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन ( मासू ) या अराजकीय विद्यार्थी संघटनेचे सर्व उमेदवारांनी घवघवीत यश संपादन केले यात अमोल रमेश राठोड याची आज एस.एस.मणियार विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थी सचिवपदी बिनविरोध निवड करण्यात आली तर मयुर लक्ष्मण कुमावत यांची उपसचिवपदी निवड करण्यांत आली व क्रिडा प्रतिनिधी फरहान खान आणि महिला प्रतिनिधी म्हणून कोमल गायकवाड यांची निवड करण्यांत आली आहे .

विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या सार्थ विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही, मासु नेहमीच विद्यार्थीहित जपत आलेली आहे आणि पुढेही विद्यार्थ्यांच्या हक्क आणि अधिकारांच्या लढाईसाठी अग्रेसर राहील असे मत यावेळी उत्तर महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे विभागप्रमुख अरुण कवरसिंग चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले.

या महाविद्यालयीन निवडणूक मध्ये विशेष करुन उत्तर महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे विभागप्रमुख अरुण कवरसिंग चव्हाण तर *ल्हा कार्यकारणी सदस्य विनोद धर्मदास सोनवणे, प्रकाश धिरा राठोड, आकाश वाळवी, अख्तर तडवी व संघटनचे इतर पदाधिकारी यांनी अथक परीश्रम घेतले होते. आणि निवडणून आलेल्या सर्व उमेदवारांचे “महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे” संस्थापक अध्यक्ष-अँड.सिद्धार्थ सोनाजी इंगळे यांनी निवडून आलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन व पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या आहेत तसेच महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या कोअर कमिटी कडुन सुद्धा शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here