<
अल्पसंख्याक असलेले समाजातील खरे लाभार्थीं चें घरे केले उद्धवस्त;
शहापुर परिसरामध्ये असलेले गावठाण जमिनीचे वाद?
जामनेर-(अभिमान झाल्टे) – जामनेर तालुक्यातील शहापूर येथील गट क्रं ३०७ या शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली गेली. शहापूर गावातील२०१५पासून गाजलेले बेकादेशीर प्लाट वाटप अतिक्रमण प्रकरण तक्रारदार भगवान पाटील यांनी २०१७ मध्ये जनहित याचिका औरंगाबाद खंडपिठात दाखल केली होती त्यावर ५/१२/२०१९ रोजी निकाल देण्यात आला असता त्यात ८आठवड्यात अतिक्रमण काढून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी असे आदेश दिले होते, त्यानुसार अतिक्रमण धारकांना ग्रामपंचायतीने नोटीस देऊन कळविले होते. तरी काही अतिक्रमण धारकांनी त्या कडे दुर्लक्ष केल्याने व न्यायालयाचे आदेशाचे पालन करण्यासाठी ग्रामपंचायतीने सदर अतिक्रमण काढण्यासाठी सुरुवात केली. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी सरपंच. ग्रामसेवक. ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी . पोलिस पाटील तसेच सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. अतिक्रमण काढताना काही अडचण उपस्थित होते .
यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यात काही अल्पसंख्याक समाजातील लाभार्थ्यांना २०११/१२ मध्ये घरकुल बांधून मिळाले होते परंतु या अतिक्रमण हटाव मोहीम मध्ये त्यांची घरेही पाडण्यात आली.
अशा परीस्थितीत खरे लाभार्थींना न्याय मिळेल का? असे प्रश्नचिन्ह आमजनतेमध्ये दिसुन येत आहे.