<
जळगाव(प्रतिनीधी)- जिल्हा महिला असोसिएशन द्वारा महिलांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने माहिती व तंत्रज्ञान कायदा(सायबर लॉ) या विषयावर सायबर क्राईम ब्रांचचे पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांचे व्याख्यान दि.८ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजता तसेच ‘यु ट्यूब’ वर वाढलेल्या अश्लील विडिओ बाबत सरकारद्वारा कठोर कायदे करणे, पॉर्न साईटवर प्रतिबंधसाठी स्वाक्षरी अभियान दुपारी २.०० वाजेपासून राबविण्यात येणार आहे. जागतिक महिला सप्ताह अंतर्गत झालेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण स्टेट लेव्हल व्हॉलीबॉल खेळाडू अंजली पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी दि.४ मार्च रोजी काढण्यात आलेल्या दुचाकी रॅलीत सहभागी सदस्यांना प्रमाणपत्र देखील दिले जाणार आहेत. सर्व कार्यक्रम काव्य रत्नावली चौकात आयोजित करण्यात आले आहे. तरी जास्तीजास्त नागरिकांनी व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन असोसिएशनच्या अध्यक्षा राजकुमारी बाल्दी यांच्याद्वारे करण्यात आले. दरम्यान, या कार्यक्रमासंदर्भात अधिक माहितीसाठी बिंदीया नांदेडकर (मो. ७०२०३४४७२४) यांच्याशी संपर्क करावा.