<
जळगांव(प्रतिनिधी)- गेल्या अनेक वर्षांपासून संपूर्ण भारतात ४५० डॉक्टर हॉस्पिटल्सच्या माध्यमातून माधवबाग मुख्यत्वे करून भारतीयांच्या हृदयाची काळजी घेत आहे. त्याचप्रमाणे डायबिटीस, हायपर टेन्शन अशा आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी माधवबाग कार्यरत आहे. कोणतीही भितीजनक परिस्थिती निर्माण झाली कि हृदयाचे ठोके वाढायला लागतात. ज्याला स्ट्रेस असे म्हटले जाते व या स्ट्रेस मॅनेजमेंट वर माधवबाग काम करीत आहे.धावपळीची जीवनशैली, अतिरेकी स्पर्धा, त्यातून निर्माण होणारे ताणतणाव, चुकीचा आणि अवेळी घेतला जाणारा आहार यामुळे आरोग्याच्या विविध समस्या भेडसावत असून बिघडलेली ही दिनचर्या सुधारणे, हीच आरोग्यपूर्ण जीवनाची गुरुकिल्ली आहे, असा सल्ला डॉ.गुरुदत्त अमीन यांनी आज शुक्रवार रोजी माधवबाग व पु.ना.गाडगीळ प्रस्तुत ‘’हार्दिक विजयोस्तव” या कार्यक्रमात दिला. कुठलीही शस्त्रक्रिया न करता हृदयरोग सारखा आजार माधवबागच्या माध्यमातून बरा होऊ शकतो असंही ते यावेळी म्हणाले. माधवबाग जळगांव व पु.ना.गाडगीळ अँड सन्सच्या वतीने “हार्दिक विजयोत्सव” या कार्यक्रमाचे आज शहरातील पु.ना.गाडगीळ येथील सभागृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून डॉ. गुरुदत्त अमीन मुंबई हे उपस्थित होते.
प्रसंगी आलेल्या मान्यवराच्या हस्ते धनवंतरी पूजनाने कार्यक्रमाची सुरवात केली व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. नंतर डॉ. गुरुदत्त अमीन यांनी जमलेल्या माधवबागच्या रुग्णांशी आपल्या शैलीत संवाद साधला. पुढे माधवबागचे डॉ. श्रद्धा माळी मार्गदर्शन करताना म्हणाले की, आजच्या धकाधकीच्या व धावपळीच्या जिवनात ताणतणाव व बदलती जिवनशैलीमुळे मधुमेहाचे प्रमाणही वाढत चालले आहे. आणि माधवबागने मधुमेहावरती अथक संशोधन करून हा असाध्य अशा मधुमेहावरती विजय मिळवण्याची गुरूकिल्ली शोधली आहे.एकेकाळी मैदानी खेळांची परंपरा होती. त्यासाठी लागणारा व्यायाम व्हायचा, योग्य आहार घेतला जायचा त्यामुळे जीवनशैलीजन्य आजारांचे प्रमाण कमी होते. पण गेल्या काही वर्षात झालेल्या जीवनशैलीतील बदलांमुळे या आजारांनी हळूहळू डोकं वर काढायला सुरवात केली आहे. व्यायाम, खेळ कमी झाल्याने आणि मांसाहार , मद्यपान, तळलेले पदार्थ यासारख्या गोष्टी अंगीकारल्या गेल्याने मधुमेह, अतिरक्तदाब, हृदयविकार हे आजार वाढू लागले आहेत. अनेक लोकांना मधुमेह, अतिरक्तदाब, हृदयरोग यासारख्या आजारांनी ग्रासले आहे. या आजारांच्या उपचारांसाठी साधारण ३-५ लाख रुपयांचा खर्च या रुग्णांना करावा लागत आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी माधवबाग गेल्या अनेक वर्षांपासून संशोधन, उपचार आणि जनजागृती या तीन प्रकारे कार्यरत आहे. व क्लिनिक्सचे जाळे असलेले माधवबाग महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आणि दिल्ली या राज्यातून कार्यरत आहे. प्रसंगी माधवबागच्या उपचार पद्धतीने मधुमेह व हृदयरोगावर विजय मिळवलेल्या ४० जणांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ.गुरुदत्त अमीन यांच्यासह माधवबाग जळगांवचे डॉ. श्रद्धा माळी, डॉ. श्रेयस महाजन, पु.ना.गाडगीळचे व्यवस्थापक समीर मैंद, माधवबाग मराठवाडाचे आयआरसी हेड धनंजय जोशी, निवृत्त कोषागार अधिकारी जी.टी. महाजन, चाळीसगाव पोस्ट मास्टर सुजित माळी, जळगांव पोलीस बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी, पूजा पाटील, गायत्री नांद्रे, वैशाली बोरसे, आकाश माळी, विजय बोदडे, प्रियंका चव्हाण, मयुरेश पाटिल, योगेश पाटिल, सोमनाथ शिंपी आदी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमित माळी यांनी मांडले तर आभार डॉ. श्रेयस महाजन यांनी मानले.