<
जळगाव(प्रतिनिधी):- विद्यार्थ्यांना ज्ञानरचनावाद या पद्धतीने सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशित प्रवेश होणे किवा संक्रमण होणे हे प्रत्यक्ष कृतितुन व स्वानुभवातून लक्षात यावे या उद्देशाने प्रगती विद्यामंदिर शाळेतील शिक्षक मनोज भालेराव यांनी प्रत्यक्ष मैदानावर या उपक्रमाचे नियोजन केले.यात त्यांनी एक मोठे वर्तुळ आखुन त्या वर्तुळावर १२ विद्यार्थिनींना समान अंतरावर १२ राशिंच्या पाट्या घेऊन क्रमाने उभे केले.केंद्र स्थानी एकाला सूर्य म्हणून उभे केले.एका मुलीला पृथ्वी म्हणून सूर्य असलेल्या विद्यार्थ्याकड़े पाहत त्याच्याभोवती गोलाकार कक्षेत फिरायला लावले.सूर्याकडे फिरत असलेल्या पृथ्वीला सूर्य तर दिसेलच पण सूर्याच्या पाठीमागिल एखादा तरकासमुह पण दिसेल,पण सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे तो प्रत्येक्षात दिसत नाही.याचा अर्थ असा की जेव्हा पृथ्वी आपले स्थान बदलते तेव्हा सूर्याच्या पार्श्वभूमिवरील रास बदलते.यालाच आपण सूर्याने एखाद्या राशित प्रवेश केला किवा संक्रमण केले असे म्हणतो.मकरसंक्रांत हे एक असेच संक्रमण आहे. प्रत्यक्ष सूर्य भ्रमण करत नसतो,तर पृथ्वीच्या सूर्यभोवतीच्या फिरण्यामुळे सूर्य फिरल्याचा आपणास आभास होतो.यालाच सूर्याचे भासमान भ्रमण व त्या मार्गाला सूर्याचा भासमान मार्ग म्हणतात.सूर्याचे पूर्वेस उगवने व पश्चिमेला मावळणे हे सूर्याचे भासमान भ्रमनच आहे.या विषयीची माहिती या उपक्रमातुन देण्यात आली.या नंतर मुख्याध्यापक शोभा फेगडे यांनी विद्यार्थाना या उपक्रमातील माहितीला विज्ञानाच्या दृष्टिकोणातुन पाहणे महत्वाचे आहे या विषयी मार्गदर्शन केले.
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षक मनोज भालेराव, शिक्षकेतर कर्मचारी विजय चव्हाण, विद्यार्थी तेजस पवार आणि मिलिंद वाणी यांनी परिश्रम घेतले.