<
जळगांव(प्रतिनिधी)- शासकीय निर्देशानुसार कोरोना आजाराचा धोका लक्षात घेता, गर्दीचे कार्यक्रम टाळावे या हेतूने जळगाव जिल्हा महिला असोसिएशनद्वारा दि.८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रम सद्यस्थितीत स्थगित करण्यात आले असून पुढील तारीख लवकरच कळविण्यात येईल असे असोसिएशनच्या अध्यक्षा राजकुमारी बाल्दी यांनी सांगितले.