<
जळगाव(प्रतिनिधी)- येथे सरस्वती विद्या मंदिरात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरवातीला सरस्वती पूजन शाळेच्या मुख्याध्यापिका दिपाली देवरे यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थीनीनी राजमाता जिजाऊ,महाराणी पद्मावती,किरण बेदी, सावित्रीबाई फुले,सानिया मिर्झा, कल्पना चावला, राणी लक्ष्मिबाई,मुक्ताबाई यासारख्या विविध वेशभूषा करून भाषण दिले. यावेळी ग.स.सोसायटी अध्यक्ष मनोजकुमार पाटील यांनी मार्गदर्शन केले. तेजस्विनी कचवे, ज्ञानेश्वर पाटील, यांनी महिला बद्दल मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराची होळी करण्यात आली. होळी बद्दल मनोगत सविता ठाकरे यांनी व्यक्त केले. इयत्ता ८ वी च्या विद्यार्थीनीने सूत्र संचालन केले. कार्यक्रमाचे आयोजन नियोजन दिपाली देवरे कल्पना वसाने यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुवर्णलता अडकमोल, सुप्रिया पाटील, निलिमा भारंबे, विद्या पाटील, उज्वला ब्राम्हणकर, माधुरी अत्तरदे, सीमा जोशी, मानसी जगताप यांचे लाभले.