<
कासोदा ता.एरंडोल ( सागर शेलार ) :- कासोदा येथील जिल्हा परिषद उर्दु शाळा नं. २ संरक्षक भिंत बांधकामाचे भूमिपूजन जिल्हाधिकारी डॉ.अविनाशजी ढाकने यांच्या हस्ते करण्यात आले.
सविस्तर असे की जळगांव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ . अविनाशजी ढाकणे व जिल्हा मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.बी एन पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत व १४ वा वित्त आयोग योजने अंतर्गत गांवातील तसेच संपुर्ण जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना संरक्षक भिंत बांधकामाचे योजिले असतांना आज दि. ७ मार्च रोजी कासोदा येथील तळई रोडा लगत असलेल्या जिल्हा परिषद उर्दु शाळा नं. २ येथे संरक्षक भिंत्तिचे भूमीपूजन जिल्हाधिकारी डॉ .अविनाशजी ढाकणे व मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. बी एन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रम सोहळा आमदार चिमणराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला . कार्यक्रमाप्रसंगी एरंडोल प्रांताधिकारी विनय गोसावी , गट विकास अधिकारी एरंडोल बी.एस.अकलाडे , तहसीलदार अर्चना खेतमाळीस , मा.जि.प.अध्यक्षा उज्वलाताई पाटील , मा.जि.प.उपाध्यक्ष हिंमत पाटील , सरपंच मंगलाबाई , राक्षे वनकोटे – बांभोरी सरपंच उमेश पाटील ,एरंडोल उपसभापती अनिल महाजन , जि.प.सदस्य नाना महाजन , सरपंच पुत्र भैय्या राक्षे , रवी चौधरी , भास्कर चौधरी , नरेश ठाकरे , भूषण शेलार , नंदू खैरनार , मुख्तार सर , अशोक पाटील सर , सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.