<
जामनेर पोलिस स्टेशन मध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल;जामनेर तालुक्यामध्यें चोंराचा धुंमाकुळ
जामनेर-(अभिमान झाल्टे) -पंक्चर झाल्याने उभ्या असलेल्या कंटेनरचे सिल तोडून अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास “लाखोंचा”मद्यसाठा चोरून नेल्याची घटना घडली असून जामनेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औरंगाबाद येथील कंपनीतून मद्यसाठा(बियर चे 1,200बॉक्स.) जळगांव जिल्ह्यातील नशिराबाद येथे घेऊन निघालेला कंटेनर क्रं-MH~20, D.E~2017 हा पहूर ते नेरी दरम्यान मकरा फटाका फॅक्टरी जवळ मागील दोन्ही टायर पंक्चर झाल्यामुळे ड्रायव्हरने उभा केला होता.
कंटेनर मध्ये विविध कंपनीचे 1,200 बियरचे बॉक्स होते.चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास कंटेनरच्या दरवाज्याला असलेले कंपनीचे सिल तोडून तब्बल 1 लाख,11 हजार,084 रुपये.किमतीच्या विविध कंपनीच्या 47 बियर बॉक्सचा मद्यसाठा चोरून नेल्याची घटना दि-27 फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.
फिर्यादी-पंडित तुकाराम मदन रा-केळीगव्हाण,ता-बदनापूर, जि-जालना.यांच्या फिर्यादीवरून दि-6 मार्च 2020रोजी अज्ञात चोरट्यां विरोधात जामनेर पोलीसात गु.र.नं- 73/2020 भा.द.वि.कलम-379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. असून पुढील तपास पोलीस निरीक्षक-प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.-अरविंद मोरे हे करीत आहेत..