दिनांक 8 मार्च हा दिन आपण महिला दिन जागतिक महिला दिन म्हणून आपण साजरा करतो. भारत देश जरी विकसित देशात गणला जात नसला, तरी विकसनशील देशात आपली गणना होते. येणाऱ्या वीस वर्षात विकसित देशात आपली गणना होईल, यात शंका नाही. ज्या देशात स्त्री पुरुष समानता आहे, ते देश जगाच्या पाठीवर आघाडीवर आहे असे दिसून येते. त्यासाठी महिला दिनी समस्त महिलांचा सन्मान व गौरव करणे हे प्रत्येक पुरुषाचे कर्तव्य ठरते. या कवितेतून स्त्रियांचा गौरव करण्याचा शिक्षक या नात्याने केलेला छोटासा प्रयत्न….
महिला(स्त्री)मायेचा पाझर ती म्हणजे स्त्री करुणेचा सागर ती म्हणजे स्त्री माहेर आणि सासर अश्या दोन्ही घरांचा उद्धार करते ती म्हणजे स्त्रीच मुलांचे ही खऱ्या अर्थाने संगोपन करते तीही एक स्त्री मुलांवर संस्कार करते, त्यांना घडवते तीही स्त्रीच शोषिकता जिच्या अंगी आहे तीही एक स्त्रीच अथितीचं खऱ्या अर्थाने आदर तीर्थ करते तीही एक स्त्रीच भक्तीच्या वेळी पार्वती तर संहाराच्या वेळी दुर्गा तीही एक स्त्रीच राक्षसाच्या संहारासाठी प्रत्यक्ष ईश्वराने ज्या कालिकेची निर्मिती केली तीही एक स्त्रीच खऱ्या अर्थाने सौंदर्याची खान म्हणजे तीही एक स्त्रीच ईश्वराची सर्वोत्कृष्ट निर्मिती म्हणजे तीही एक स्त्रीच अश्या या समस्त स्त्रियांना आज महिला दिनी समस्त पुरुष वर्गाकडून मानाचा मुजरा, मानाचा मुजरा…!
कवी-अरुण वांद्रे (मुख्याध्यापक- जी.प.प्राथमिक शाळा शिरसोली प्र.बो. ता.जी.जळगांव)