<
जळगाव : ढोल ताशांच्या निनादात, जागतिक महिला दिनाच्या दिवशी समाजातील मान्यवर महिलांच्या हस्ते उद्घाटन होऊन रविवारी संध्याकाळी नवकार युवा प्रतिष्ठानच्या ढोल पथकाच्या सरावाला सुरुवात झाली आहे.
पुढील महिन्यात ६ एप्रिल रोजी महावीर जन्मकल्याणक महोत्सव आहे. त्या पार्श्वभूमीवर नवकार युवा प्रतिष्ठानच्या ढोल पथकाने सराव सुरु केला आहे. यंदाचे हे दुसरे वर्ष आहे. जैन समाजात विविध कार्यक्रम होतात. मुनीश्री देखील मार्गदर्शन करीत असतात. याकरिता आता विविध कार्यक्रमांमध्ये तरुणांचा सहभाग वाढावा याकरिता ढोल पथक स्थापन करण्यात आले आहे. रविवारी नयनतारा बाफना, मंजू राका, हेमा गांधी, सोनल गांधी, उज्ज्वला मुथा`, स्वाती पगारिया, दीपा राका, सीमा गांधी या मान्यवरांच्या उपस्थितीत ढोल वाजवून खान्देश सेन्ट्रल येथे उद्घाटन झाले. महिला दिनाच्या दिवशी महिलांचा सन्मान करून त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे ढोल पथक, ध्वज नृत्य, झांज पथक असे तिघांचे मिश्रण या पथकात राहणार आहे. पथकात तरुण-तरुणी मिळून 111 सभासद आहेत. पथकासाठी संस्थापक रिकेश गांधी, दीपक निकजीया, सिद्धार्थ डाकलिया, आयुष गांधी यांच्या नेतृत्वात प्रतिक मोमाया, यश मेहता, प्रेरणा नागोरी, पूजा जैन, निधी जैन, अनिकेत लोढा, शुभम पगारिया, ललित बाफना, विनय गांधी जैन बोर्डिंगचे युवक हे परिश्रम घेत आहेत.