<
जळगांव(प्रतिनिधी)- लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव व स्पेक्ट्रम इंडस्त्रीज जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दिनांक ८मार्च रोजी जागतिक महिला दिन व औद्योगिक सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला.
स्पेक्ट्रम इंडस्ट्रीच्या सर्व शाखांमध्ये समाजकार्य महाविद्यालयाच्या मानव संसाधन विभागाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून औद्योगिक सुरक्षा व व सुरक्षात्मक उपाययोजना, कामाच्या ठिकाणी मोबाईलचे दुष्परिणाम, व त्यातून होणारे अपघात, मानव संसाधन विभागाची भूमिका, विविध औद्योगिक कायदे, आरोग्य, व्यसनाधीनता व व्यसनाधीनतेचे कामगारांच्या जीवनावरील दुष्परिणाम, कोरोना सारख्या संसर्गजन्य आजारांची माहिती त्याची लक्षणे व उपायोजना घ्यावयाची खबरदारी या सारख्या संसर्गजन्य आजार इत्यादी विषयावर उद्योगातील शेकडो कामगारांना मार्गदर्शन केले. सदर पथनाट्य संघात मयुरेश निंबाळकर, योगेश वाडेकर,लतेश चौधरी, वैष्णवी खैरनार, वनिता चव्हाण, माधुरी रणदिवे, लीना जगताप, मानसी जावळे, किरण जाधव, कृष्णा राठोड इत्यादींनी भाग घेतला होता. सदर कार्यक्रम आयोजनासाठी स्पेक्ट्रम इंडस्ट्रीचे मॅनेजिंग डायरेक्टर दीपक चौधरी, मानव संसाधन विभागाचे अधिकारी महेंद्र चौधरी, एकता सक्सेना, दीपक वाणी यांनी आयोजन केले. सदर कार्यक्रमासाठी क्षेत्र कार्य समन्वयक प्राध्यापक डॉ उमेश वाणी, प्राध्यापक डॉ. राकेश चौधरी व क्षेत्र कार्य पर्यवेक्षक प्राध्यापक डॉ. योगेश महाजन यांनी मार्गदर्शन केले.