<
केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प. वी.पाटील विद्यालय येथे होळीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील यांनी विद्यार्थ्यांना कोरोना या आजाराविषयी माहिती सांगितली तसेच आपण त्याला कशाप्रकारे प्रतिबंध करू शकतो याविषयी मार्गदर्शन केले.
उपशिक्षक नेमीचंद झोपे यांनी विद्यार्थ्यांना होळी या सणाचे महत्त्व पटवून सांगितले. त्या अनुषंगाने आज आपण खऱ्या अर्थाने प्रदूषणाची होळी करायला हवी या उद्दिष्टाने शाळा आणि शाळेच्या परिसरातील कचरा विद्यार्थ्यांनी एकत्र करून त्या कचऱ्याची होळी तयार केली व पेटवली आपण आपल्या परिसरात कोणत्याच प्रकारचा कचरा होऊ देणार नाही तसेच नेहमी परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करू अशी प्रतिज्ञा याप्रसंगी विद्यार्थ्यांनी घेतली.
कार्यक्रमाचे आयोजन उपशिक्षक योगेश भालेराव यांनी केले तर उपशिक्षिका स्वाती पाटील व अशोक चौधरी यांनी सहकार्य केले प्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.