संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयात होळी सणानिमित्त कागदाच्या कच-यासह दुर्गुणाची होळी

जळगाव :  मेहरूण परिसरातील संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयात होळी सणानिमित्त कागदाच्या कच-यासह दुर्गुणाची होळी करण्यात आली. तसेच एकमेकांना रंग लावत धुलीवंदनदेखील विद्यार्थ्यांनी साजरा केली.

सुरुवातीला होळीचे पूजन मुख्याध्यापिका शीतल कोळी यांनी केले. यानंतर हिंसा, अत्याचार, कोरोना आजार असे विविध दुर्गुण लिहिलेल्या पाट्या होळीत ठेवून दुर्गुणांची होळी करण्यात आली. होळी संस्थेचे सचिव मुकेश नाईक यांच्या हस्ते पेटविण्यात आली. 
धुलीवंदनला रसायन मिश्रित रंगांचा होणारा वापर हा शरीरासाठी हानिकारक ठरत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नैसर्गिक रंगांचा वापर करीत धुलीवंदन साजरा केला. विद्यार्थ्यांनी एकमेकांना रंग लावून धुलीवंदनच्या एकमेकांना सदिच्छा दिल्या. प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रशांत नाईक यांनी विद्यार्थ्यांना रेन डान्सचे देखील आयोजन करून दिले. होळीच्या विविध गीतांवर विद्यार्थ्यांनी धम्माल करीत जल्लोष केला. 
कार्यक्रमासाठी विद्यालयातील शिक्षक  ,  रोहिणी शिंदे,माधुरी सपकाळे, जया पाटील, किरण पाटिल, छाया केदार, हर्षा काळे ,कविता बढे,  गीता भावसार,  आम्रपाली शिरसाठ, सरीता परदेशी, माधुरी विधुर ,शोभा सपके  तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here