<
तोंडापूर ता. जामनेर – (अभिमान झाल्टे) – तोंडापूर सह परिसरात आज दि ९ रोजी दुपारी २ ते अडीच च्या दरम्यान अवकाळी पावसाला सुरुवात झाल्याने रब्बी च्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तोंडापूर परिसरात आज सकाळ पासून वातावरणात बदल होते.
या वातावरणीय हवामानामुळे शेतकरी वर्गात भीतीचे भय निर्माण झाले होते. दुपारी २ वाजेच्या दरम्यान वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी वर्गाची मोठ्या प्रमाणात धावपळ झाली वातावरणात बदलामुळे शेतकऱ्यांनी काही प्रमाणात गव्हाची कापणी करण्यात आली होती.
कापणी करण्यात आलेला गहू जमीन वर ओला झाला तर जास्त प्रमाणात मकाचे पिके उभे असल्याने मका वाऱ्यामुळे आडव्या झाल्या व हरभरा गव्हाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले .तोंडी घास आला असून या बेमौसमी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यां मध्ये भीती युक्त वातावरण निर्माण झाले आहे. आज सायंकाळ पर्यंत वातावरण ढगाळ असल्याने पुन्हा पाऊल येतो कि काय या चिंतेत शेतकऱ्यां मध्ये घबराट निर्माण झाली आहे.
झालेल्या नुकसानाची शासकीय स्तरावरून पाहणी करण्यात यावी अशी मागणी तोंडापूर येथील शेतकरी सुरेंद्र काळकर. ज्ञानेश्वर पाटील. विश्वनाथ धनगर. बनेखा पटेल .जनार्दन गवळी. शिवाजी पाटील. याचे गव्हाचे व मकाचे पिक वाऱ्यामुळे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. तोंडापूर सह भारुडखेडा ढालगाव. ढालसिंगि. हिवरखेडा किन्ही गावातून होत आहे. झालेल्या पिक नुकसानाची पाहणी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र पाटील यांनी केली.