<
कासोदा ता.एरंडोल ( सागर शेलार ) -महाराष्ट्र राज्य माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीची परीक्षा मंगळवारपासून सुरू झाली आहे . कासोदा केंद्रात साधना माध्यमिक विद्यालय , हाजी एन.एम. सय्यद उर्दु हायस्कूल , शहजादि उर्दु हायस्कूल येथे , एसएससी ची बोर्डाच्या परीक्षा घेण्यात येत आहे. मराठीच्या पहिल्या पेपर ला देखील काही कॉपी पुरवणाऱ्या बहाद्दरांना पकडून त्यांच्या पालकांना बोलून समज देऊन सोडण्यात आले होते.पण पुन्हा तसाच प्रकार घडल्याने दि.९ मार्च रोजी इंग्रजीच्या पेपर ला बैठे पथक असून देखील कॉपीचा पाऊस पडलेला दिसून दिसुन आला. शाळेत पेपर सुरू असताना बाहेरून कॉफी पुरविणाऱ्यांनी धुमाकूळ घातला असून वर्गातील विद्यार्थी अस्वस्थ झालेले दिसून येत होते.परीक्षा सुरू असताना परीक्षेदरम्यान तिघीही केंद्रांवर पोलिसांनी बाहेरून कॉपी पुरविणाऱ्या काही टवाळखोर कॉफी बहाद्दर ताब्यात घेऊन मुबंई पोलीस अधिनियम कलम ११२ , ११७ प्रमाणे कारवाई केली आहे. पोलिसांच्या कारवाईने कॉपी करणाऱ्यांना व पुरविणाऱ्यांना चांगलाच दणका बसला आहे.सदर कारवाई स.पो.नि.रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पि.एस.आय.नरेश ठाकरे , पो.ना.शरद राजपूत , पो.कॉ.जितेश पाटील , पो.कॉ.इम्रान पठाण यांनी केली.