<
जळगाव- अल्पसंख्यांक समाजाच्या कल्याणासाठी प्रधानमंत्री 15 कलमी कार्यक्रमानुसार 2019-2020 या शैक्षणिक वर्षासाठी अल्पसंख्यांक समाजातील गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांसाठी प्रि-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रीया सुरू झाली आहे. शैक्षणिक वर्ष 2019-2020 साठी अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज केंद्र शासनाच्या www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर केवळ ऑनलाईन भरावयाचे आहेत. सन 2019-20 या वर्षी ज्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज रिनीवल स्टुडंट म्हणून भरावयाचे आहेत. तसेच नवीन विद्यार्थ्यांचे अर्ज फ्रेश स्टुडंट म्हणून भरावयाचे आहेत.
प्रि-मॅट्रीक शिष्यवृत्ती नवीन विद्यार्थी (फ्रेश स्टुडंट ) व नुतनीकरण विद्यार्थी (रिनीवल स्टुडंट) यांचे ऑनलाईन अर्ज भरावयाची अंतिम मुदत 15 ऑक्टोंबर 2019 पर्यंत असून याबाबत काही तांत्रिक अडचणी आल्यास माध्यमिक शिक्षण विभागातील श्री.आर.एल.माळी यांच्या 9881381780 या भ्रमणध्वनीवर तसेच प्राथमिक शिक्षण विभागाचे शेख साकीब यांच्या 959552056 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.
शिष्यवृत्ती मिळण्यास पात्र असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन भरण्याची जबाबदारी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांची आहे. तशा सर्व संबंधित मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. एकही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहणार नाही याची संबंधितांनी दक्षता घ्यावी. असे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.