<
जळगांव(प्रतिनिधी)- येथील असोदा रोडवरील थेपडे ग्लोबल लर्निंग स्कूलमध्ये होळीचा सण वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यात प्लास्टिकचे विघटन करून कचरा जाळण्यात आला. विद्यार्थी व शिक्षकांनी प्रतिज्ञा करून शपथ घेतली की,आज पासून आम्ही प्लास्टिक चा वापर न करता त्याची योग्य विल्हेवाट लावू व शालेय परिसरातील, घरातील, आपल्या गावातील कचऱ्याचे संघटन करून त्याचे ओला व सुका कचरा असे विभाजन करू त्याला योग्य त्या कचराकुंडीत किंवा घंटागाडीत टाकू यात मुख्याध्यापक अनिल मराठे, रिना चक्रवर्ती,मनीषा भोळे, संध्या राणा, गायत्री चोरडिया, निलिमा चौधरी,सिमा चक्रवर्ती, ज्योती माळी, सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी शपथ घेऊन स्वच्छतेचा संदेश दिला.