Thursday, August 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

करोना विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी नागरीकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे- जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
करोना विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी नागरीकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे- जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे

जळगाव, दि. 11 (जिमाका) – सद्यस्थितीत जगातील बहुतांश देशांमध्ये करोना विषाणूचे रूग्ण आढळून येत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार आतापर्यंत एकूण 93 हजार 90 करोना रुग्ण आढळले असून त्यापैकी 3 हजार 198 लोक मुत्युमुखी पडले आहेत. करोना विषाणूची लक्षणे ही श्वसन संस्थेशी निगडीत असून त्यामध्ये खोकला, श्वास घेण्यास त्रास, निमोनिया, ताप इत्यादि आहेत. करोना विषाणुचा प्रसार हा प्रामुख्याने हवेद्वारे त्याचप्रमाणे शिंकणे, खोकलणे, हस्तांदोलन इत्यादि कारणांमुळे होतो.

            करोना आजाराचे अनुषंगाने 50 वर्षावरील व्यक्ती, गरोदर माता, लहान बालके, मधुमेह, कॅन्सर व किडनीचे रुग्णांनी विशेष काळजी आणि दक्षता घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून वेळोवेळी व जेवणापूर्वी नियमितपणे हात साबणाने स्वच्छ धुवावेत, शिंकताना, खोकतांना नाकावर व तोंडावर रुमाल धरावा तसेच हस्तांदोलन टाळावे. चेहरा, नाक व डोळ्यांना वारंवार हाताने स्पर्श करू नये, अर्धवट शिजवलेले तसेच कच्चे मांस खाऊ नये त्याचप्रमाणे आवश्यकता नसतांना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.

            शासनाच्या निर्देशानुसार करोना आजाराची व्याप्ती वाढू नये यासाठी सार्वजनिक ठिकाणावरील सर्व गर्दीचे कार्यक्रम नागरिकांनी टाळावेत. करोना विषाणू हा आजार संसर्गजन्य असल्याने कार्यक्रमाचे आयोजकांनी गर्दीच्या/सार्वजनिक ठिकाणावरील कार्यक्रमांचे उदा. यात्रा, जत्रा, मेळावे, परिषदा, गर्दीचे कार्यक्रम, शाळा/महाविद्यालयातील स्नेहसंमेलने, प्रदर्शने, धार्मिक कार्यक्रम, पर्यटन स्थळे व सार्वजनिक उत्सव इत्यादि प्रसंगी योग्य ती काळजी /दक्षता घेण्यात यावी. असे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

श्री संत ज्ञानेश्वर चौकामध्ये होळी पूजन

Next Post

राष्ट्रीय सेवा योजना माध्यमातून कोरोनाविषाणू जनजागृती अभियान संपन्न

Next Post
राष्ट्रीय सेवा योजना माध्यमातून कोरोनाविषाणू जनजागृती अभियान संपन्न

राष्ट्रीय सेवा योजना माध्यमातून कोरोनाविषाणू जनजागृती अभियान संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo