<
जळगाव – (प्रतिनिधी) – भारत सरकार युवा खेल मंत्रालय नेहरू युवा केंद्र जळगांव यांचे संयुक्तविद्यमाने कोरोना व्हायरस जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. सदर अभियांन हे जळगाव जिल्ह्यातील 16 तालुक्यात मोहीम राबविण्यात येत आहे. तालुक्यातील प्रत्येक शाळा, महाविद्यालय, प्रशासकीययंत्रणा, बस स्थानक,रेल्वे स्टेशन, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, कोरोना व्हायरस पासून कशा प्रकारे आपण काळजी घेऊ शकतो, याबाबत जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. संपूर्ण जगामध्ये भीतीदायक वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोना व्हायरस विरुध्द प्रतींबद्ध होऊया, करूया जागरूकता परिसराचे व घराचे स्वच्छते विषयी काळजी घेऊया. जेणेकरून अस्वच्छसोबतच होईल नाश या विष्णूचा खोकलतांना शिंकताना तोंड झाकूया रुमालाने. दिवसातून हात धुवू चार ते पाच वेळा साबणाने गर्दीचे ठिकाने,एकमेकांशी सुरक्षित आंतरवरून संसर्ग टाळ्या, सर्वे नागरिकांना मास्क वापरा किंवा स्वच्छ रुमाल वापरावे असे आवाहन केले आहे. असे आवाहन नेहरू युवा केंद्र जळगाव जिल्हा समनव्यक श्री नरेंद्र डागर यांनी केले आहे.