<
जळगाव : शहरातील आदर्श महिला माहेश्वरी मंडळातर्फे जागतिक महिला दिनानिमित मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. या शिबिरात २५ हून अधिक जणांची तपासणी करण्यात येऊन मोफत ११ शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
आदर्श माहेश्वरी महिला मंडळातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. सामाजिक बांधिलकी म्हणून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचा महत्वाचा उपक्रम घेण्यात आला. यादिवशी समाजातील गरजू पुरुष-महिलांची मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. शीतल अग्रवाल यांनी रुग्णांना तपासून त्यांचे ऑपरेशन केले.
कार्यक्रमासाठी संस्थापिका शीतल मंत्री, माजी अध्यक्षा सुषमा मणियार यांनी सहकार्य केले. शस्त्रक्रियेसाठी सुषमा मणियार यांनी मंडळाच्या वतीने ५ तर स्वाती सोमाणी, पुष्पा दहाड, अध्यक्षा मनीषा तोतला यांनी प्रत्येकी ३ शस्त्रक्रियेसाठी सहकार्य केले. मोतीबिंदू होऊ नये या करिता घ्यावयाची काळजी डॉ. शीतल अग्रवाल यांनी उपस्थिताना सांगितली. : सुषमा राठी यानी डॉ.अग्रवाल यांचा परिचय करून दिला. डॉ. अग्रवाल यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सचिव अमिता सोमाणी, संध्या मुंदडा, सरिता बापेचा, स्वाती सोमाणी, पुष्पा दहाड़, शुभांगी मणियार, सोनाली काबरा, सुषमा राठी उपस्थित होते.