<
जळगांव(प्रतिनिधी)- जि.प. शाळा वाकटुकी ता.धरणगाव येथे मातापालकांसाठी एक दिवसाच्या शाळेचे व विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सर्व प्रथम विद्यार्थी व माता पालक यांनी सोबत प्रार्थना म्हटले. सर्व उपस्थित माता पालकांना नावाचे बॅच लावण्यात आले. रोज प्रमाणे हजेरी घेण्यात आली. लंगडी, खो खो, धावणे या स्पर्धा घेण्यात आले. या वेळी इंग्लिश व गणित विषयावर शाळेतील शिक्षिका रामेश्वरी बडगुजर यांनी विद्यार्थी व मातापालकाना अध्यापन केले. मातापालक व विद्यार्थ्यांनी बोधकथा, सुविचार, म्हण सादर केले. संगणक बाबत माहिती देण्यात आले. तसेच मोबाईलचे फायदे व नुकसान त्याचा वापर कसा करावा या बाबत चर्चा करण्यात आली. यावेळी संभाजी बिराजदार यांनी मार्गदर्शन केले. शाळेचे शिक्षण व शिक्षका बाबत मातापालकांनी समाधान व्यक्त केले. या उपक्रमात मातापालकांनी आपले मनोगत व्यक्त करून बालपणाचा आनंद लुटला. या उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. अंजनविहीरे शाळेतील सुलोचना शिंदे यांनी जागतिक महिला दिन बाबत माहिती देण्यात आली. मतापालक, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी जेवणाचा आस्वाद घेत या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या उपक्रमाचे आयोजन आदर्श शिक्षिका रामेश्वरी बडगुजर यांनी केले. सुलोचना शिंदे, संभाजी बिराजदार यांचे सहकार्य लाभले.