<
जळगाव-(प्रतिनिधी) – अनुभूती निवासी शाळेतील विद्यार्थ्यांच्या कल्पनेतून सर्जनशिलता या विविधांगी उपक्रमाचा भाग म्हणून विद्यार्थी वर्षभरात कलेचे विविध प्रकार अभ्यासत असतात. चित्रकला, शिल्पकला, विणकाम, पॉटरी (मातीकाम) या कलांचा अभ्यास करून त्यांनी निर्माण केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन असेलला ‘आर्ट मेला’ चे उद्घाटन करण्यात आले. या आर्ट मेळ्याचे उद्घाटन जळगाव शहरातील प्रसिद्ध चित्रकार सचिन मुसळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन, प्राचार्य जे.पी.राव, यशवंतराव प्रतिष्ठानचे ॲड. रविंद्र पाटील, सौ. अंबिका जैन उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेला सुंदर पॉट निशा जैन यांचेहस्ते सचिन मुसळेंना देऊन स्वागत करण्यात आले.
भाऊंच्या उद्यानातील आर्ट गॅलरीत अनुभूती निवासी शाळेतील इ. 5 ते 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या निवडक कलाकृतींचे त्यात पेंटीग, पॉट, विणकाम व बाटीककाम यांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. उद्या दि. 15 मार्चला रविवारी ‘आर्ट मेला’ सर्वांसाठी खुला असेल.
विद्यार्थ्यांचे कलागुण कौतुकास्पद- सचिन मुसळे
माझ्या जीवनात कला क्षेत्रात उभं राहण्यासाठी अशोकभाऊ जैन यांनी प्रोत्साहन दिल्याचे सांगत सचिन मुसळे यांनी अनुभूती च्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना कलागुणांसह घडता यावे यासाठी संचालिका सौ.निशा जैन या विशेष लक्ष देत असल्याने विद्यार्थी घडत असल्याचे ते म्हणाले. चांगल्या कलेच्या निर्मितीसाठी तितकी साधनसामग्री उपलब्ध करून देणे महत्त्वाचे असते. अनुभूती स्कूलमध्ये ती मिळत असल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला.
सांस्कृतिक कार्यक्रमाला रसिकांची दाद
तसेच उद्यानातील अँफीथिएटर मध्ये उद्घाटनानंतर सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हिच अमुची प्रार्थनाने सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरूवात झाली. नाम गाऊ नाम घ्या नामे विठुबाला पाहु, तु बुध्दी दे, सारे जहाँ से अच्छा, एक सप्तक में, नाम जपन क्यो, नाम जपन बर्वेगा यासह एकल गायन, देशभक्तीपर गीत, अभंग, भजन विद्यार्थ्यांनी सादर केले. तेरा मंगल मेरा मंगलने सांगितीक कार्यक्रमाची सांगता झाली. ताल त्रिकाल, वेस्टर्न, विद्यार्थ्यांच्या गाणी व तबला वादनाच्या सादरीकरणाला रसिकांनी दाद दिली. राम निरंजन, सचिन राऊत, प्रितम दास , हर्षल पाटील, यांच्यासह सर्व शिक्षकांनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले. शिवांगी सिंग, देवांश आसावा यांनी सूत्रसंचालन केले.