<
जळगाव – (विषेश) – येत्या 4, 5 व 6 एप्रिल रोजी भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव निमित्त दर वर्षीप्रमाणे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र कोरोना संसर्गाचा जगभर वाढता प्रादुर्भाव व धोका लक्षात घेता सर्व कार्यक्रम स्थगित केल्याचे घोषित करण्यात आले आहे.
जैन समाजाचे आधारस्तंभ सुरेशदादा जैन, ईश्वरबाबूजी जैन, रतनलालजी बाफना, अशोकभाऊ जैन तसेच सकल जैन श्री संघाचे संघपती दलीचंद जैन, मंदिरमार्गी संघ अध्यक्ष भागचंद बेदमुथा, तेरापंथ सभेचे अध्यक्ष माणकचंद बैद तसेच दिगंबर संघाचे अध्यक्ष राजेश जैन यांच्यासह प्रदीप रायसोनी, अजय ललवाणी व महोत्सव समितीच्या अध्यक्षा भारती रायसोनी यांसह समाज बांधवांनी विचार विनिमय करून एकमताने महोत्सव- कार्यक्रम स्थगित करण्याचे ठरविले आहे.
आज राज्य शासनाने सुद्धा शाळा, कॉलेजना सुट्या घोषित केल्या आहेत तसेच गर्दीचे कार्यक्रम टाळण्याचे आवाहन केले त्यास जैन समाजाच्या वतीने तात्काळ प्रतिसाद देण्यात आला.