<
जामनेर-(अभिमान झाल्टे) – जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी भीती बाळगू नये तसेच सोशल मीडियावर कोरोना संदर्भात अर्धवट माहिती असणारे ,चुकीचे व भीती उत्पन्न करणारे संदेश फिरत आहेत असे कोणतेही संदेश अधिकृत स्रोताकडून खात्री करून घेतल्याशिवाय पुढे पाठवू नयेत असे आव्हान जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. समाधान वाघ यांच्याकडून करण्यात आले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पोटोडे यांच्या सूचनेनुसार जिल्हा महिला व माता बालसंगोपन अधिकारी डॉ. समाधान वाघ यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृह जामनेर येथे कोरोना आजारासंदर्भात जामनेर व बोदवड तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांची तातडीची बैठक जामनेर पंचायत समिती सभागृत घेण्यात आली.
वैद्यकीय अधिकारी,आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात कोरोना आजारविषयक जनजागृती करावी.जळगाव जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण आढळून आलेला नाही त्यामुळे नागरिकांनी भीती बाळगू नये तसेच सोशल मीडियावर कोरोना संदर्भात अर्धवट माहिती असणारे ,चुकीचे व भीती उत्पन्न करणारे संदेश फिरत आहेत असे कोणतेही संदेश अधिकृत स्रोताकडून खात्री करून घेतल्याशिवाय पुढे पाठवू नयेत असे आव्हान जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. समाधान वाघ यांच्याकडून करण्यात आले.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांना कोरोना आजाराबाबत सविस्तर माहिती दिली व घ्यावयाची खबरदारी व उपाययोजना बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.हात साबण स्वच्छ पाण्याने धुणे.परगावी प्रवास टाळणे.शिकतांना व खोकताना नाकावर व तोंडावर रुमाल ठेवणे.विदेशातून किंवा लागण झालेल्या शहरातून आलेल्या किंवा त्यांच्या संपर्कात असणाऱ्या व्यक्तीशी संपर्क टाळने व सर्दी किंवा फ्लू सारखी लक्षणे आढळल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा हे प्रतिबंधात्मक उपाय करण्याबाबत तालुका आरोग्य अधिकारी यांनी मार्गदर्शन केले जवळपास 1 महिन्यापूर्वी 4 नागरिक चीन वरून जामनेर येथे आले असून त्यांना कोणत्याही प्रकारचे लक्षणे आढळून आलेले नसल्याचे व आरोग्य विभागाची प्रतिबंधात्मक उपाययोजना यावर लक्ष ठेऊन असल्याचे डॉ.सोनवणे यांच्याकडून सांगण्यात आले.
डॉ.पल्लवी सोनवणे यांनी प्रत्येक प्रा.आ.केंद्राकडून कोरोना विषयी जनजागृती करण्यात येणार असल्याचे सांगितले व फळे,प्रथिनयुक्त व सकस आहार,योगासन,व्यायाम करून स्वतःची प्रतिकारशक्ती वाढविल्यास कोणत्याच प्रकारच्या विषाणूजन्य आजाराची लागण होणार नाही अशी माहिती दिली.जामनेर व बोदवड तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी आढावा बैठकीस डॉ.मनोज चौधरी ,डॉ योगेश राजपूत, डॉ.विवेक जाधव,डॉ.विनोद भोई,डॉ.प्रवीण पाटील,डॉ.नरेंद्र नाईक,डॉ.कुणाल बाविस्कर,डॉ.अजय सपकाळ,डॉ.संदीप जैन,डॉ.मनोज तेली,डॉ.नरेश पाटील,डॉ.जितेंद्र वानखेडे,डॉ.संदीप पाटील,डॉ.राहुल निकम आणि डॉ.मनोज पाटील उपस्थित होते तसेच सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.