<
जळगांव(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघ राज्य महासचिव राज्य प्रवक्ते तसेच राज्यातील शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझरकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह जिल्हा परिषदेच्या उपोषण स्थळी माध्यम समूह तसेच उपोषणकर्त्या शिक्षक बंधू भगिनींना विनंती नुसार भेट देऊन त्यांचे म्हणणे काल दिनांक 14 रोजी संध्याकाळी व आज दिनांक 15मार्च दुपारी 2वाजता भेट देऊन तासभर चर्चा करुन समजून घेतले. शिक्षक संघटना राज्य समन्वय समितीचे राज्याध्यक्ष अर्जुनराव साळवे तसेच महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अरुण जाधव यांचेशी उपोषणकर्त्यांची सह किशोर पाटील कुंझरकर यांनी संवाद साधला. राज्य मंत्रिमंडळातील मंत्री महोदय यांची आपण लवकरच भेट घेणार असून जिल्हा परिषदेची चौकशी अधिकारी, जळगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी व जि.प.चे उपशिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांचे सोबत किशोर पाटील कुंझरकर यांनी उपोषणस्थळी संवाद साधला. शिक्षक बंधू भगिनींना लहान मुलांना सोबत घेऊन उपोषण करावे लागते हे कुठल्याही शिक्षक व कर्मचाऱ्याला वाईट वाटणारे चित्र आहे आगामी काळात न्याय मिळावा यासाठी पुढाकार घेण्यास जळगाव जिल्ह्यातील इतर शिक्षक संघटना प्रमाणे आपणही पुढाकार घेऊ असे त्यांनी स्पष्ट केले. शहरातील झिपरू अण्णा विद्यालयाचे चार शिक्षक संस्था व मुख्याध्यापक यांचे मनमानी कारभार मुळे उपोषणास बसले असून त्यांचे निवेदन तात्काळ राज्याच्या शिक्षण मंत्र्यांकडे पाठवल्याचे शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझरकर यांनी म्हटले. यावेळी आर.के.पाटील, शिक्षण विस्ताराधिकारी विजय पवार, हेमंत पाटील, अजित चौधरी, गोविंदा लोखंडे आदी उपस्थित होते.