<
जळगांव(प्रतिनिधी)- कुसुंबा खुर्द येथील श्री स्वामी समर्थ प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात संस्थाध्यक्ष मनोजकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनातुन कोरोना विषाणू प्रसार व आपला त्यातून बचाव या विषयावर विद्यार्थाना मार्गदर्शन करण्यात आले. शिक्षकांनी विद्यार्थाना प्रशासनाने सुट्टी जाहीर करण्यापुर्वी घरी काळजी कशी घ्यावी याबाबत प्रात्यक्षिके सादर केली. यात हात स्वच्छ धुण्याच्या पध्दती, शित पध्दतीचे पदार्थ खाणे टाळणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, सर्दी, खोकला व ताप आल्यास वैद्यकीय मदत घेणे. या विषयी जनजागृती करण्यात आली. प्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रतिक्षा पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना जीवनात सातत्यपूर्ण स्वच्छतेचे आणि आरोग्याचे नियम पाळण्याचे महत्त्व किती आहे हे पुन्हा एकदा या निमित्ताने पटवून दिले. प्रत्येकाने आपल्या आरोग्याची आपण स्वतः काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे ते यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.