<
जळगाव – (प्रतिनिधी) – दि 14 मार्च रोजी केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वी.पाटील विद्यालय तसेच एटी झांबरे माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने केसीई सोसायटी चे माजी अध्यक्ष अण्णासाहेब डॉ.जी. डी. बेंडाळे यांच्या सहचारिणी सौ शालिनीताई बेंडाळे यांनी दिलेल्या देणगीतून शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना दरवर्षी जी.डी.बेंडाळे शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते.
त्याप्रमाणे यावर्षी सुद्धा केसीई सोसायटीचे कार्यकारी मंडळाचे सदस्य डी. टी.पाटील तसेच डॉ.प्रभावती महाजन यांच्या हस्ते शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. दरवर्षी इयत्ता 1ली ते 10 वी मध्ये शिकणाऱ्या गरीब परंतु अभ्यासू तसेच अभ्यासाबद्दल ची जिद्द व चिकाटी असणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड या शिष्यवृत्तीसाठी केली जाते. यावर्षी साधारणतः 30 ते 35 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली. विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय जीवनामध्ये अभ्यास करण्यासाठी लागणारे शैक्षणिक साहित्य त्यांना घेता यावे या उद्देशाने ही शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षिका प्रणिता झांबरे यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका रेखा पाटील यांनी मानले. प्रसंगी शालेय शिक्षण समन्वयक के.जी.फेगडे तसेच चंद्रकांत भंडारी मुख्याध्यापक डी.व्ही.चौधरी सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.