<
जळगाव, दि. 17 (जिमाका) – राज्यातील हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्याकरिता व विणकरांनी उत्पादीत केलेले उत्कृष्ठ वाणाला सन्मान मिळावा या दृष्टीकोनातून मुंबई विभागात विभागीय हातमाग कापड स्पर्धा दिनांक 19 मार्च, 2020 रोजी आयोजित करण्यात आली होती.
सदर स्पर्धा मा. आयुक्त, वस्त्रोद्योग, महाराष्ट्र शासन, नागपूर यांचकडील दि. 17 मार्च, 2020 अन्वये पुढील आदेश होई पावेतो स्थगित केले आहे. तरी कृपया विणकरांनी याबाबत नोंद घ्यावी. असे अहवान प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग, मुंबई यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.