<
जळगांव(प्रतिनिधी)- श्री.रामचंद्र मिशन, युनायटेड नॅशन्स इन्फॉर्मेशन सेंटर आणि द हार्टफुलनेस एज्युकेशन ट्रस्ट यांच्या वतीने राष्ट्रीयस्तरावरील निबंध लेखन स्पर्धेत ए.टी.झांबरे विद्यालयाची विद्यार्थीनी कु.तन्वी मनोज वाघ हिने विशेष गुणवत्ता यादीत यश संपादन केले. त्यात तिला जागतिकस्तरावर कार्य करणाऱ्या युनो इन्फॉर्मेशन सेंटरचे विशेष गुणवत्ता प्रमाणपत्र देखील मिळाले. तिने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे विद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. यावेळी, मुख्याध्यापक डी.व्ही चौधरी, शालेय समन्वयक के.जी.पाटील, पर्यवेक्षिका श्रीमती पी.के.झांबरे, सी.बी.कोळी, व्ही.एस.आर्य, डी.ए.पाटील वडील मनोज वाघ आदी शिक्षक उपस्थित होते.