<
पाचोरा-(महाराष्ट्र विषेश प्रतिनिधी – प्रमोद सोनवणे) – येथील बस स्थानकाच्या पुढील भागात असलेले अतिक्रमण काढण्यासाठी पाचोरा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात छत्रपती शिवाजी महाराज नगर भागात शंभर ते दीडशे वर्षापासून आमचे पूर्वज रहिवासी असून सदर भागात उत्तरेस भिंतीला लागून शहर विकास आराखड्यानुसार आरक्षित रस्ता मंजूर असून नागरिकांचे वापरासाठी हा रस्ता मंजूर असला तरी याठिकाणी मोठमोठे पत्र्याची लोखंडी शेड बांधून अतिक्रमण करण्यात आले असून त्यात अधिक वाढ होण्याची शक्यता असल्याचे म्हंटले असून अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद होत असून एखादी दुर्घटना घडल्यास रुग्णवाहिका तसेच अग्निशमन दलाचे वाहने अतिक्रमणामुळे येऊ शकणार नाही तसेच शांतता व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तरी सर्व नागरिकांच्या वतीने पाचोरा नगर परिषद मुख्याधिकारी सदर अतिक्रमणावर तत्काळ कारवाई करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली आहे .
या निवेदनावर सुरेश पाटील, किशोर रायसाकडा, दीपक पाटील ,गफूरशाह, भिकन मोरे ,वाजिद बागवान संजू मोरे ,प्रवीण मोरे,मेहमूद बागवान, सय्यद युनुस लक्ष्मीबाई मिस्तरी, नबी बागवान, मुन्नी मन्यार, प्रशांत पाटील ,विवेक पाटील, मुकेश पाटील, अतुल लिगडे, राजू पाटील ,बाळू जाधव,सुरेश पाटील, अजय पाटील, राजू पाटील,सय्यद हमीद नूर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.