<
जामनेर-(अभिमान झाल्टे) – तळेगाव. सावरला .आमखेडा. फत्तेपुर .कासली .वाकडी . परिसरात अवकाळी पाऊस गारपीट व वादळी वाऱ्यामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आलेला घास निसर्गाने हिरवल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत .
गहू हरभरा काढणी वर आला असतांना हा वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .
मका पिकाचे देखील मोठ्या प्रमाण नुकसान झाले असून परिसरात काही शेतकऱ्यांनी टरबूज लागवड देखील केली आहेत टरबूज शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या सह भाजीपाला पिकांना देखील फटका बसला आहे शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी कारण यावर्षी अतिवृष्टीमुळे खरीप तर गेले होते रब्बी वर आशा व त्यावर रब्बी मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे हरवल्याने शेतकरी मोठ्या संकटांत फसले आहे.
कापूस पिकाचे ती देखील कमी भाव असल्याने आर्थिक नुकसान शेतकरी व्यवसाय मध्ये होत आहे.अशी समस्या निर्माण होत असल्याने एकच प्रश्न उभा राहत आहे.
तरी शासनाने या शेतकर्यांना त्वरित मदत द्यावी अशी मागणी शेतकर्याकंडुन होत आहे.